Rahul Gandhi : ‘नरेंद्र मोदींमध्ये नाही दम’ राहुल गांधी नेमकं म्हणाले काय की उठलं वादळ, म्हणाले ओबीसींबाबत माझी ती मोठी चूक, Video पाहाच

Rahul Gandhi on PM Narendra Modi : UPA सरकार सत्तेत असताना जातनिहाय जनगणना न करणे ही मोठी चूक झाल्याची कबुली राहुल गांधी यांनी दिली. त्याचवेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली.

Rahul Gandhi : नरेंद्र मोदींमध्ये नाही दम राहुल गांधी नेमकं म्हणाले काय की उठलं वादळ, म्हणाले ओबीसींबाबत माझी ती मोठी चूक, Video पाहाच
राहुल गांधींच्या वक्तव्याने खळबळ
| Updated on: Jul 26, 2025 | 8:56 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात दम नाही, मीडियाने त्यांना मोठं केलंय, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केले. त्यांच्या या वक्तव्याने मोठी खळबळ उडाली आहे. दिल्लीत ओबीसींच्या भागीदारी न्याय महासंमेलनात त्यांच्या या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचवल्या. UPA सरकार सत्तेत असताना जातनिहाय जनगणना न करणे ही मोठी चूक झाल्याची कबुली राहुल गांधी यांनी दिली.

मोदी मोठी समस्या नाही

नरेंद्र मोदी म्हणजे मोठी समस्या नाही. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही डोक्यावर बसलवयं. मीडियावाल्यांनी फुगा तयार केला. पूर्वी तर मी भेटलो नव्हतो. आता मी दोन-तीन वेळेस भेटलो. मला आता समजलं, त्यांच्यात काहीच नाही. सगळा शो आहे. काही दम नाही. तुम्ही त्यांना भेटले नाहीत, मी भेटलोय. त्यांच्यासोबत रूममध्ये बसलो. चर्चा केली, अशी जमके बॅटिंग त्यांनी केली. त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. त्याचवेळी काँग्रेसच्या काळातील चुकांवर बोट सुद्धा ठेवले.

ओबीसींबाबत ती माझी मोठी चूक

राहुल गांधी यांनी राजकीय जीवनाचा पट उलगडला. 2004 मध्ये राजकारणात आलो. आता त्याला 21 वर्षे झाली. मी माझ्या राजकीय जीवनाचे आत्मपरिक्षण करतो. मी कुठे योग्य काम केलं आणि कुठं कमी पडलो, याचा धांडोळा घेतो. जमीन अधिकरण कायदा, मनरेगा कायदा आणि आदिवासी समाजासाठीचे विधेयक ही चांगली कामगिरी आहे. पण एका चुकीची मला कबुली द्यावी लागेल. मी ओबीसी वर्गाचं संरक्षण करण्यात कमी पडलो. मी ओबीसी वर्ग समजून घेतला असता तरी ही चूक झाली नसती.

UPA सरकार असतानाच मी जातनिहाय जनगणना करणे गरजेचे होते. मी या मंचावरून सांगतो, ती माझी मोठी चूक होती. मी ती चूक सुधारणार आहे. मी ओबीसी समजाला सांगतो की, त्यावेळी ओबीसी समाजासाठी मी जे करायला हवे, ते त्यावेळी केले नाही. पण आता मी दुप्पटीने या वर्गासाठी काम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. आता मागे हटणार नाही. राहुल गांधींनी जातनिहाय जनगणनेचा मुद्दा उचलून धरला होता. त्यानंतर मोदी सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचे धोरण जाहीर केले. लवकरच देशात डिजिटल जातहिनाय जनगणना होईल. जनगणनेला 2011 नंतर मुहूर्त लागला नाही. 2021 मध्ये कोरानाचे संकट आल्याने जनगणना होऊ शकली नाही. आता मोदी सरकारने जनगणनेचे व्यापक धोरण जाहीर केले आहे.