Narendra Modi in Hyderabad LIVE : पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी’चे लोकार्पण

 पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजात स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं म्हणजेच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं (Statue Of Equality) लोकार्पण होणार आहे.

Narendra Modi in Hyderabad LIVE : पंतप्रधान मोदींच्या हस्ते स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचे लोकार्पण
पंतप्रधान नरेंद्र मोदी
| Edited By: | Updated on: Feb 05, 2022 | 9:09 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते आज संध्याकाळी 5 वाजात स्वामी रामानुजाचार्य यांच्या पुतळ्याचं म्हणजेच स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीचं (Statue Of Equality) लोकार्पण होणार आहे. हैदराबाद (Hyderabad) येथे हा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. स्वामी रामानुजाचार्य (Saint Ramanujacharya) यांच्या पुतळ्याचं लोकार्पण ही त्यांना योग्य श्रद्धांजली ठरणार आहे, असं ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून या सोहळ्याबाबतची माहिती दिली आहे. आज संध्याकाळी 5 वाजता स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटीच्या उद्घाटन सोहळ्याला मी जाणार आहे. ही श्री रामानुजाचार्य स्वामी यांना योग्य श्रद्धांजली असेल. त्यांचे विचार आणि शिकवण सदैव आपल्याला प्रेरणा देत असते, असं मोदींनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. भद्र वेदीत वैदिक डिजीटल पुस्तकालय आणि संसाधन केंद्र, प्राचीन भारतीय ग्रंथ, एक थिएटर आदीचं संचलन केलं जातं.