AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Women Reservation: महिला आरक्षण विधेयकावरून खडाजंगी, संसदेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी घडलं काय?

Nari Shakti Vandan Act Women Reservation Bill 2026: महिला आरक्षण बिलासह मतदार संघ पुनर्रचना विधेयक सादर करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. पण त्याअगोदर संसदेच्या कनिष्ठ सभागृहात, लोकसभेत मोठा गोंधल दिसला. विरोधी पक्षांनी सरकारवर आणि हेतूवर टीका केली.

Women Reservation: महिला आरक्षण विधेयकावरून खडाजंगी, संसदेच्या विशेष अधिवेशनात पहिल्याच दिवशी घडलं काय?
नारी शक्ती वंदन विधेयक, लोकसभाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 16, 2026 | 1:04 PM
Share

Parliament Session over Women Reservation Bill 2026: सध्या चर्चेत असलेले नारी शक्ती वंदना विधेयक, लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक सादर करण्याचा सरकार प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. लोकसभेत त्यापूर्वी विरोधकांनी सरकारच्या हेतूवर आणि या बिलातील त्रुटींवर हल्ला बोल केला. तीनही बिलावर उद्या संध्याकाळी चार वाजता मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. सध्या पाच राज्यांच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे. पुद्दुचेरीत निवडणूक झालेली आहे. तर इतर दोन राज्यातील मतदान झाले आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अशावेळी हे बिल सादर करण्यास विरोधकांचा विरोध आहे.

संसदेत बिल सादर करण्याचा प्रस्ताव मंजूर

नारी शक्ती वंदन विधेयक, लोकसभा-विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेत सादर करण्याचा घटनेतील दुरुस्तीचा प्रस्ताव बहुमताने मंजूर झाला. या विधेयकावर चर्चा व्हावी यासाठी 251 मते पडली तर विरोधात 185 मते पडली आहेत. उद्या, 17 एप्रिल रोजी सध्याकाळी चार वाजता या तीनही विधेयकावर चर्चा सुरू होईल. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज दुपारी तीन वाजता लोकसभेत त्यांचे मत मांडतील.

नारी शक्ती वंदन विधेयकावर काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे?

केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी नारी शक्ती वंदन विधेयकावर मत माडंले. आजचा दिवस हा महिलांसाठी महत्त्वपूर्ण आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून महिला आरक्षणाची मागणी होत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात महिला आरक्षण देण्याचा हा प्रयत्न आहे. विधेयक मंजूरीनंतर महिलांचा टक्का वाढेल. विरोधकांना मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाची कोणतीही अडचण नाही. पण महिला विधेयकावरून त्यांचा विरोध सुरू आहे. काँग्रेससाठी केवळ एकच महिला महत्त्वाची आहे.

विरोधकांचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर निशाणा साधला. नारी शक्ती वंदन अधिनियम हे तीन बिलासह दाखल होणार होते. सभागृहाने सहमतीने ते मंजूर केले. पण विरोधक सकाळफासूनच या बिलाला विरोध करण्याचा पवित्रा घेऊन आले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

तर लोकसभेत विरोधी पक्षांनी घटनेच्या 131 व्या दुरुस्ती बिल, 2026 सादर करण्याला विरोध केला. त्यांनी अगोदर मतदान प्रक्रियेवर जोर दिला. DMK खासदार टीआर बालू, AIMIM खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यासह काँग्रेसच्या खासदारांनी बिल सादर करण्यास हरकत घेतली. TMC आणि CPI-M ने बिल सादर करण्यास विरोध दाखवला.

Follow Us
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?.

NEET पेपरफुटीप्रकरणी सरकार बँकफुटवर, संसदेत चर्चा होणार? पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्षाची भूमिका काय?

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा