इतिहासाकडून शिकला नाही, तर त्या घटनांची पुनरावृत्ती होते, नवज्योत सिंग सिद्धूंचा इशारा

| Updated on: Jan 26, 2021 | 8:52 PM

प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनावर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Navjot Singh Sidhu reaction on Delhi Farmers Tractor rally violence).

इतिहासाकडून शिकला नाही, तर त्या घटनांची पुनरावृत्ती होते, नवज्योत सिंग सिद्धूंचा इशारा
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीत शेतकऱ्यांचा आंदोलनाला आज हिंसक वळण लागलं. या आंदोलनावरुन विरोधकांकडून केंद्र सरकारवर निशाणा साधला जात आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांचं दिल्लीच्या सीमेवर शांततेत आंदोलन सुरु होते. मात्र, आज प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढत आपला रोष व्यक्त केला. या आंदोलनावर काँग्रेस नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Navjot Singh Sidhu reaction on Delhi Farmers Tractor rally violence).

“तुम्ही इतिहासाकडून काही शिकला नाहीत तर तो इतिहास पुन्हा त्याच घटनेची पुनरावृत्ती करतो. आजपर्यंत कोणतंही सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जावून जिंकलेलं नाही, असं इतिहासाने आपल्याला सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया सिद्धू यांनी दिली.

दिल्ली धुमसली, शरद पवार, संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

दिल्ली आंदोलनाला हिंसक हिंसक वळण मिळाल्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रातही बघायला मिळाले. महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यांनी या आंदोलनावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारला संयमाने निर्णय घेण्याचं आवाहन केलं. केंद्र सरकारने याप्रकरणी टोकाचा निर्णय घेऊ नये, असंही शरद पवार म्हणाले.

“दुर्लक्ष करून चालणार नाही”

“पंजाब-हरियाणा देशाचा अन्नदाता आहे. न दुखावता मार्ग काढायला हवा होता. ज्या पद्धतीने येण्या जाण्यासाठी काही परवानग्या द्यायला हव्या होत्या. पण जाचक अटी लादल्या गेल्या. त्यामुळे प्रतिकार झाला. संयम आणि 60 दिवसांचं आंदोलन पाहून ही परिस्थिती हाताळायला हवी होती. पण ते न केल्याने वातावरण चिघळलं. जे घडतंय त्याचं समर्थन नाही, पण ते का घडतंय याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. शांततेने आंदोलन करणारा शेतकरी संतप्त का होतो याची जबाबदारी घ्यायला हवी होती,” असेही शरद पवारांनी सांगितले.

“केंद्राने अजूनही शहाणपणा दाखवावा. टोकाची भूमिका घेऊ नये. रास्त प्रश्नासंबंधित ज्या मागण्या असतील त्याला अनुकूल निर्णय घ्यावा. बळाचा वापर करून काही निर्णय घेतला. एकेकाळी अस्वस्थ पंजाब पाहिला आहे. तो सावरला आहे. त्या पंजाबला अस्वस्थतेकडे नेण्याचा पातक मोदी सरकारने करू नये हे आवाहन आहे,” असेही पवार म्हणाले.

संजय राऊतांचा केंद्र सरकारवर घणाघात

“राष्ट्रीय शरमेची ही बाब आहे. आज प्रजासत्ताक दिवस आहे. पूर्ण देश, पूर्ण विश्व आपल्या शक्तीचं, ताकदीचा अनुभव घेत असतं. राजपथावर आमच्या सैन्याचं सामर्थ्य दिसतं. मात्र आज दिल्लीच्या रस्त्यावर आज जे चित्र दिसलं ते ना आंदोलकांना शोभा देतं, ना सरकारला. दोन महिन्यापासून शांततेने आंदोलन सुरु होतं. जगभरात त्याचं कौतुक होतं. शेतकऱ्यांचं इतकं शिस्तबद्ध आंदोलन जगात कुठे झालं नाही. आज अचानक काय झालं? शेतकऱ्यां चा संयमाचा बांध फुटला. त्यांनी थेट लाल किल्ल्यावर कूच केली. सरकार काय करत होतं? सरकार याच दिवसाची वाट पाहात होतं का? शेतकऱ्यांचा संयमाचा बांध तुटणार होता, तर ती सरकारचीही जबाबदारी होती”, असा घणाघात संजय राऊत यांनी केली.

संबंधित बातम्या : 

दिल्लीत हिंसा भडकली हे गुप्तचर यंत्रणेचं अपयश; संजय राऊतांचं थेट अमित शहांकडे बोट

राजपथावर सामर्थ्य दिसत होतं, आज ‘शरम’ दिसली : संजय राऊत