नक्षली कनेक्शन : ‘त्या’ पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी संबंधासंदर्भात पुणे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्रात दिग्विजय सिंह यांचा संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळली आहे आणि त्याआधारे दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. […]

नक्षली कनेक्शन : 'त्या' पत्रात दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By:

Jul 05, 2019 | 5:00 PM

योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी संबंधासंदर्भात पुणे पोलिस चौकशी करण्याची शक्यता आहे. कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्रात दिग्विजय सिंह यांचा संपर्क क्रमांक आढळल्याची माहिती पुणे पोलिसांनी मिळली आहे आणि त्याआधारे दिग्विजय सिंह यांची चौकशी करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मध्य प्रदेशमध्ये सध्या विधानसभा निवडणुकांचं वातावरण आहे. अशा काळात दिग्विजय सिंह यांची नक्षलवादी कनेक्शनप्रकरणी चौकशी झाल्यास, काँग्रेसची प्रतिमा मलीन होण्यास ही गोष्ट कारणीभूत ठरु शकते. त्यामुळे दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेसच्याही अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबित पात्रांचा आरोप

याआधी 4 सप्टेंबर 2018 रोजी भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन कॉम्रेड प्रकाश यांच्या कथित पत्राचा दाखला देत, दिग्विजय सिंह यांचा त्या पत्रात मोबाईल नंबर असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी संबित पात्रा यांनी दिग्विजय सिंह यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते.

दिग्विजय यांचे स्पष्टीकरण

त्यानंतर दिग्विजय सिंह यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन संबित पात्रा यांना उत्तर दिले होते. तेव्हा दिग्विजय सिंह म्हणाले होते की, “जर असे असेल, तर सरकारने मला अटक करावी. आधी देशद्रोही आणि आता नक्षलवादी असल्याचा आरोप माझ्यावर केला जातो आहे.”, असे थेट आव्हानच दिग्विजय सिंह यांनी केले होते. त्यानंतर पुढे संबित पात्रा किंवा कुठल्याच भाजपच्या नेत्याने हे आव्हान स्वीकारले नाही. त्यामुळे हे केवळ दिग्विजय सिंह यांच्या बदनामीसाठी केले होते का, असाही सवाल उपस्थित केला होता.

दिग्विजय सिंह कोण आहेत?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि गांधी घराण्याचे निकटवर्तीय अशी दिग्विजय सिंह यांची ओळख आहे. 1993 ते 1998 आणि 1998 ते 2003 असे दोन कार्यकाळ दिग्विजय सिंह हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें