Droupadi Murmu : राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू दिल्लीत, आज दुपारी 12 वाजेनंतर उमेदवारी अर्ज दाखल करणार
मी सर्वांचे आभार मानतो आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वांचे सहकार्य मागतो. 18 जुलैपूर्वी मी सर्व मतदारांना (खासदारांना) भेटेन आणि त्यांचा पाठिंबा घेईन.

नवी दिल्ली : एनडीए (NDA)च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) काल त्यांच्या मूळ राज्य ओडिसा भुवनेश्वरहून दिल्लीत आल्या. तसेच त्या आज आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. पण यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. झारखंडच्या माजी राज्यपाल 64 वर्षीय मुर्मू शुक्रवारी पंतप्रधान मोदी, ज्येष्ठ मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा या नेत्यांच्या उपस्थितीत आज दुपारी 12 वाजेनंतर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. नामांकना दरम्यान, राज्य सरकारचे दोन ज्येष्ठ मंत्री ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) चे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
द्रौपदी मुर्मू आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
द्रौपदी मुर्मू या एनडीएच्या आणि पर्यायाने भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार आहेत. त्यां कालच दिल्लीत दाखल झाल्या आहेत. आज त्या आपला उमेदवारी दाखल करणार आहेत. दुपारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दुपारी 12 वाजेनंतर त्या आपला अर्ज दाख करतील. यावेळी ओडिसा सरकारचे दोन ज्येष्ठ मंत्री ओडिशातील सत्ताधारी बिजू जनता दलाचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
बीजेडीने मुर्मू यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे. तर मुर्मू यांचा उमेदवारी अर्ज संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या निवासस्थानी तयार करण्यात येत आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या करत आहेत. बीजेडीचे सस्मित पात्रा, ज्यांच्या पक्षाने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला आहे, त्यांनी जोशी यांच्या घरी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आहे. तर मुर्मू या दिल्लीत आल्यावर, दिल्ली भाजप अध्यक्ष आदेश गुप्ता, पक्षाचे खासदार मनोज तिवारी आणि दिल्ली विधानसभेतील विरोधी पक्षनेते रमेश बिधुरी यांच्यासह अनेक नेत्यांनी मुर्मू यांचे विमानतळावर स्वागत केले.
प्रशासकीय आणि सार्वजनिक अनुभवाचा संपूर्ण देशाला फायदा
त्यानंतर आपल्या या भेटीबद्दल गृहमंत्री शाह यांनी ट्वीट केले. ते म्हणाले, NDA च्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मूजी यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नावाच्या घोषणेने आदिवासी समाजात अभिमानाची भावना आहे. मला खात्री आहे की, त्यांच्या प्रशासकीय आणि सार्वजनिक अनुभवाचा संपूर्ण देशाला फायदा होईल.
सर्वांचे सहकार्य मागतो
दरम्यान राष्ट्रीय राजधानीला रवाना होण्यापूर्वी ओडिशातील एका संक्षिप्त निवेदनात मुर्मू म्हणाल्या की, मी सर्वांचे आभार मानतो आणि राष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वांचे सहकार्य मागतो. 18 जुलैपूर्वी मी सर्व मतदारांना (खासदारांना) भेटेन आणि त्यांचा पाठिंबा घेईन. राष्ट्रपतीपदासाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपत आहे.