Presidential Election : भाजपकडून राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर, कशी आहे मुर्मू यांची कारकिर्द?

भाजपकडून राष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. भाजपनं आदिवासी महिला चेहरा द्रौपदी मुर्मू यांनी उमेदवारी जाहीर केलीय. त्यांनी शिक्षण क्षेत्रात मोठं काम केलं आहे.

Presidential Election : भाजपकडून राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी द्रौपदी मुर्मू यांना उमेदवारी जाहीर, कशी आहे मुर्मू यांची कारकिर्द?
सागर जोशी

|

Jun 21, 2022 | 9:52 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ सुरु असतानाच मोठी बातमी दिल्लीतून आहे. एनडीएच्या वतीनं राष्ट्रपतीपद निवडणुकीसाठी (Presidential Election) द्रोपदी मुर्मू यांना उमेदवारी घोषीत केली आहे. भारतीय जनता पार्टीच्या संसदीय मंडळाची बैठक झाली. ही बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या उपस्थितीत पार पडली. त्या बैठकीनंतर द्रोपदी मुर्मू यांचं राष्ट्रपती पदाच्या उमेदवार म्हणून नाव घोषीत करण्यात आलं. द्रोपदी मुर्मू (Draupadi Murmu) ह्या सध्या झारखंडच्या राज्यपाल असून भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. विशेष म्हणजे एनडीएच्या सहकारी पक्षांनीही मुर्मू यांच्या नावावर सहमती दर्शवल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

द्रोपदी मुर्मूच का? एनडीएच्या बैठकीत एकूण 20 नावावर चर्चा झाली. त्यातूनच मग मुर्मू यांच्या नावावर एकमत झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं. यावेळेसचा राष्ट्रपती उमेदवार हा देशाच्या पूर्व भागातला असावा, तसच तो आदिवासी असावा एवढच नाही तर ती महिलाही असावी अशी चर्चा झाली आणि ह्या सर्व बाबी द्रोपदी मुर्मू पूर्ण करतात. त्यामुळेच त्यांच्या नावावर एकमत झाल्याचं नड्डा यांनी सांगितलं.

कोण आहेत द्रौपदी मुर्मू?

  1. द्रौपदी मुर्मू हा झारखंडच्या नवव्या राज्यपाल होत्या. पण पाच वर्षाची टर्म पूर्ण करणाऱ्या पहिल्या राज्यपाल ठरल्या.
  2. झारखंडची स्थापना 2000 साली झाली. त्यानंतर 2015 ते 21 दरम्यान मुर्मू ह्या राज्यपाल होत्या.
  3. द्रौपदी मुर्मू ह्या मुळच्या ओडिशा राज्याच्या आहेत आणि त्या आदिवासी समाजातून येतात.
  4. ओडिशात त्या भाजपा- बिजू जनता दल युती सरकारमध्ये मंत्री होत्या.
  5. 2000 ते 2004 दरम्यान त्या रायरंगपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या.
  6. विशेष म्हणजे द्रौपदी मुर्मू यांचं वैयक्तिक आयुष्य मात्र शोकांतिकेनं भरलेलं आहे. मुर्मू यांच्या पतीचं निधन झालेलं आहे. एवढच नाही तर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झालाय. सध्या त्यांच्या कुटूंबात त्यांची एकुलती एक मुलगी आहे.

द्रौपदी मुर्मू यांची राजकीय कारकिर्द

1997 मध्ये मुर्मू या रायरंगपूर नगर पंचायतीच्या नगरसेवक म्हणून निवडून आल्या होता. भाजपच्या अनुसूचित जमाती मोर्चाच्या उपाध्यक्षा म्हणून काम पाहिलं. 2000 मध्ये त्या रायरंगपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या. ओडिशातील बीजेडी आणि भाजप युती सरकारमध्ये त्यांनी वाणिज्य आणि वाहतूक मंत्रालय सांभाळलं. त्यानंतर 2000 ते 2004 दरम्यान मत्स्यव्यवसाय आणि प्राणी संसाधन खात्याची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. 2015 मध्ये, मुर्मू यांनी झारखंडच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून शपथ घेतली होती.


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें