AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

24 तासात कोरोनाचे 5 हजार रुग्ण, 85 हजार चाचण्या, आरोग्य विभाग म्हणाले…

मागच्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचे रुग्ण अधिक सापडत आहेत. काल एका दिवसात बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याची माहिती मिळाली आहे. मागच्या चोवीस तासात 5,880 नवीन रुग्ण सापडले असल्याची माहिती मिळाली आहे.

24 तासात कोरोनाचे 5 हजार रुग्ण, 85 हजार चाचण्या, आरोग्य विभाग म्हणाले...
corona patientImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Apr 10, 2023 | 11:35 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोना बाधित (Corona Positive) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने (health department) चिंता व्यक्त केली आहे. जाहीर करण्यात आलेल्या ताज्या आकडेवारीनुसार मागच्या चोवीस तासात रुग्णांमध्ये १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे मागच्या चोवीस तासात 5,880 कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या देशात 35,199 कोरोना रुग्णांची संख्या आहे. मागच्या तीन वर्षात कोरोनाला रोकण्यासाठी केंद्र सरकारकडून लसीकरण (vaccination from the central government) करण्यात आलं होतं.

कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात आतापर्यंत 220.66 कोटी लस नागरिकांना देण्यात आल्या. सुध्या कोरोनाचे रुग्ण अधिक वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाने पुन्हा चिंता व्यक्त केली आहे. त्याचबरोबर गेल्या 24 तासात 205 डोस देण्यात आले आहेत. लोकांना सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क वापरणे, त्याचबरोबर वारंवार हात धुणे या गोष्टींची सुचना केली आहे.

देशव्यापी लसीकरण मोहीमेअंतर्गत आतापर्यंत 220.66 करोड लोकांना लसीकरण करण्यात आलं आहे. 95.21 करोड लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. 22.87 कोटी प्रतिबंधात्मक डोस दिले आहेत.त्याचबरोबर मागच्या 24 तासांमध्ये 205 डोस देण्यात आले आहेत.

आकड्यांवरुन सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर 98.73 टक्के आहे. मागच्या 24 तासात 3,481 लोकं आतापर्यंत कोरोनामुक्त झाली आहेत. देशात कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या 4,41,96,318 इतकी आहे. दिवसाला कोरोना रुग्ण

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मागच्या चोवीस तासात 85,076 टेस्ट करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 92.28 करोड लोकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत.

देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्याचबरोबर पुर्वी ज्या पद्धतीने काळजी घेतली जात होती. त्याचपद्धतीने काळजी घ्यावी असं आरोग्य विभागाने जाहीर केलं आहे.

Follow Us
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन