Neet 2026 Paper Leak : या व्हॉट्सग्रुपने पेपर फोडले, मल्टी-स्टेट नेटवर्क, मास्टरमाईंड कोण ?

NEET 2026 पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने तपास सुरु केला आहे. या प्रकरणात महाराष्ट्र ते हरियाणा, राजस्थानपासून अनेक राज्यात आरोपींचे नेटवर्क पसरलेले होते असे उघडकीस आले होते. या प्रकरणात एक व्हॉट्सअप ग्रुप देखील स्थापन करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे.

Neet 2026 Paper Leak : या व्हॉट्सग्रुपने पेपर फोडले, मल्टी-स्टेट नेटवर्क, मास्टरमाईंड कोण ?
Neet 2026 Paper Leak
| Updated on: May 12, 2026 | 7:47 PM

NEET 2026 पेपर फुटी प्रकरणाचा तपास केंद्र सरकारने सीबीआयकडे सोपवला आहे. सीबीआयच्या मते एजन्सीला या प्रकरणाच्या तपााचा आदेश मिळालेला आहे आणि लवकरच नियमित केस दाखल करुन तपास सुरु होणार आहे. यानंतर सीबीआयची विशेष टीम स्थापन केली जाणार आहे, जी संपूर्ण देशात प्रकरणाचा तपास करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यात NEET पेपर फुटीचा विस्तार पसरलेला आहे.

राजस्थानच्या SOG च्या तपासात महाराष्ट्र, उत्तराखंड आणि राजस्थानचे लिंक समोर आले आहेत. आंतरराज्यीय कटाच्या संशयानंतर सीबीआयच्या टीम या राज्यात जाऊन तपास करु शकतात. सूत्राच्या मते GFX इन नीटचा हा पेपर नाशिकच्या प्रिटींग प्रेसमध्ये कॉपी केला होता. नाशिकहून हा पेपर हरियाणा येथे आला, येथील गुरुग्रामच्या एका डॉक्टरकडे तो पोहचला. हरियाणा येथून पेपर जयपूरला पोहचला आणि जयपूरहून जमवारामगडला पोहचल्याचे उघड झाले आहे.

कसा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पोहचला पेपर ?

राजस्थानच्या जमवारामगडहून पेपर सीकरला पोहचल आणि नंतर सीकरहून हा पेपर देशाच्या अन्य राज्य जम्मू-कश्मीर, बिहार आणि केरळपर्यंत पोहचला. नाशिकच्या प्रिटींग प्रेसमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. सूत्रांच्या मते केस दाखल होताच सीबीआय राजस्थान एसओजीकडून केस फाईल, दस्तावेज आणि आता पर्यंत जमवलेले पुरावे आपल्या कब्जात घेईल. तसेच नॅशनल टेस्टिंग एजन्सी(NTA)कडून सर्व महत्वाची माहीती आणि रेकॉर्ड घेतले जातील.

सध्या राजस्थान SOG या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे. आणि अनेक लोकांना ताब्यात घेतलेले आहे. तपासात असे पुढे आले आहे की ज्या कथित गेस पेपरला आधी सर्क्युलेट केले गेले होते. त्यातील ६० प्रश्न खऱ्या परीक्षेत तसेच आले आहेत. या प्रश्नात लाईन, कॉमा, आणि शब्दांचा देखील बदल नव्हता.

Private Mafia व्हाट्सएप ग्रुप

तपास एजन्सीना Private Mafia नावाने एक व्हॉट्सअप ग्रुप देखील सापडला आहे. या ग्रुपमध्ये सुमारे ४०० सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. ग्रुपच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की हा ग्रुप केवळ लीक एग्झाम पेपर अपलोड करण्यासाठी बनवलेला आहे आणि पेपर्सना ग्रुपच्या बाहेर फॉरवर्ड न करण्याचा इशाराही दिलेला होता. SOG सूत्रांचा दावा आहे की एजन्सीने या प्रकरणाचा गुंता जवळपास सोडवला आहे आणि सीबीआयला केस ट्रान्सफर करण्याआधी केस दाखल करण्याची तयारी चालू आहे.

पेपरचा लीक मास्टरमाईंड आला समोर

या प्रकरणात दोन महत्वाची नावे समोर आली आहेत. मनिष यादव याला कथित मास्टरमाईंड म्हटला जात आहे. तर राकेश मंडावरिया याच्यावर पेपर वितरण केल्याचा आरोप आहे. एसओजीने दोघांना ताब्यात घेतले आहे. मनिष यादव याला जयपूरवरुन पकडण्यात आले आहे. मात्र, या प्रकरणात अजूनपर्यंत अधिकृत एफआयआर दाखल केलेला नाही.
तपासात हे देखील उघडकीस आले आहे की सर्वात आधी बायोलॉजीचे ९० प्रश्न आणि केमिस्ट्रीचे ३५ प्रश्न लीक झाले होते. दावा केला जात आहे की परीक्षेत बायोलॉजीतील सर्व ९० प्रश्न आणि केमिस्ट्रीचे ४६ पैकी ३५ प्रश्न फुटलेले होते आणि आधीच व्हायरल होत होते. आता संपूर्ण प्रकरणावर देशभराचे लक्ष लागले असून अशी आशा आहे की सीबीआय चौकशीनंतर या पेपर लीक नेटवर्कशी जोडलेल्या मोठ्या नावांचा खुलासा होऊ शकतो.

 

Follow Us