नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठं यश, आणखी एकाला अटक, अहिल्यानगर कनेक्शन उघड!

नीट पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडे या तरुणाल अटक करण्यात आली आहे. या तरुणाचे वय 26 वर्षे आहे. पोलिसांनी त्याला अटक केले आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात CBI ला मोठं यश, आणखी एकाला अटक, अहिल्यानगर कनेक्शन उघड!
neet paper leak
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: May 13, 2026 | 3:46 PM

NEET Paper Leak : नीट पेपरफुीट प्रकरणात आता तपासाची गती वाढवण्यात आली आहे. या तपासादरम्यान रोज अनेक धक्कादायक असे खुलासे होत आहेत. या प्रकरणात नासिकमधून एकाला अटक करण्यात आले आहे. त्यानंतर आता याच पेपरफुटीचे धागेदोर थेट अहिल्यानगरापर्यंत पोहोचले आहेत. NEET पेपरफुटी प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून CBI ने आणखी काही संशयतांना घेतले आहेत. या संशयीतांची सीबीआयकडून चौकशी केली जाणार आहे. या संशयीतांच्या चौकशीतून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सीबीआयचे पथक अहिल्यानगरात

मिळालेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या संशयितांची अहिल्यानगर पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी सुरू आहे. याच प्रकरणात अटक करण्यात आलेल्या धनंजय लोखंडेची देखील चौकशी केली जात आहे. 12 मे रोजीपासून मुबंईचे CBI पथक अहिल्यानगरमध्ये दाखल झालेले आहे. ताब्यात घेतलेल्या संशयितांची नीटच्या पेपरफुटी प्रकरणात नेमकी काय भूमिका आहे, याचा तपास केला जात आहे. पोलिसांनी नीट पेपरफुटी प्रकरणात सर्वात अगोदर नाशिकमधून शुभम खैरनार याला अटक केले होते. त्यानेच केलेल्या खुलाशांच्या मदतीने आता सीबीआय अहिल्यानगरात दाखल झाली आहे.

धनंजय लोखंडे कोण आहे?

नीट पेपरफुटी प्रकरणात अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातून धनंजय लोखंडे या तरुणाल अटक करण्यात आली आहे. या तरुणाचे वय 26 वर्षे आहे. पोलिसांनी त्याला अटक केले आहे. 12 मे रोजीच्या सकाळीच त्याला सीबीआयकडे सोपवण्यात आले. धनंजय लोखंडे याचे शेवटचे लोकेशन पुणे येथील होते. परंतु अटक टाळण्यासाठी तो पुण्याहून अहिल्यानगरात गेला होता. पोलिसांनी मात्र त्याला अहिल्यानगरातून शोधून काढले आहे.

शुभम खैरनार याचे मध्य प्रदेशपर्यंत धागेदोरे

नीटच्या पेपरफुटी प्रकरणातील शुभम खैरनार याचा संबंध मध्य प्रदेशातील सिहोर या भागाशी होता. त्याने 2021 साली सिहोर येथील एका विद्यापीठात बीएएमएस करण्यासाठी प्रवेश घेतला होता. परंतु प्रवेश घेतल्यापासूनच तो अनुपस्थित होता, असे विद्यापीठाच्या कुलगुरूंनी सांगितले आहे. दरम्यान, आता या प्रकरणाची चौकशी सुरू झाल्याने, त्यात आणखी कोण-कोणती नावे समोर येतील, याकडे देशाचे लक्ष लागले आहे.

Follow Us