AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Paper Leak : नीट पेपर लिकप्रकरणी लवकरच मोठा गौप्यस्फोट, नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई; आता सगळं बाहेर येणार!

नीट परीक्षेचा पेपर अगोदरच फुटला होता, असा दावा केला जात आहे. या गंभीर आरोपानंतर आता नीट परीक्षाच रद्द करण्यात आली आहे. ही परीक्षा आता नव्याने घेतली जाणार आहे. परंतु आता पालक आणि विद्यार्थी संताप व्यक्त करत आहेत.

NEET Paper Leak : नीट पेपर लिकप्रकरणी लवकरच मोठा गौप्यस्फोट, नाशिकमध्ये सर्वात मोठी कारवाई; आता सगळं बाहेर येणार!
neet paper leakImage Credit source: tv9 marathi
| Updated on: May 12, 2026 | 3:04 PM
Share

NEET Paper Leak Scam : दरवर्षी लाखो विद्यार्थी नीटची परीक्षा घेतात. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी म्हणजेच डॉक्टर होण्यासाटी ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते. यावेळीही 3 मे रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. परंतु या परीक्षेत पेपरफुटी झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर आरोपानंतर आता देशात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या आरोपानंतर आता ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता ही परीक्षा नव्याने घेण्यात येणार आहे. दुसरीकडे या कथित पेपरफुटीचा तपासही चालू करण्यात आला आहे. याच तपासात महाराष्ट्राला हादरवून टाकणारी एक माहिती समोर आली आहे. या पेपरफुटीत नाशिक कनेक्शन समोर आले आहे.

नेमकी काय माहिती समोर आली?

मिळालेल्या माहितीनुसार नीट पेपरफुटी प्रकरणात नाशिक कनेक्शन समोर आले आहे. तपास संस्थांनी नासिकमधून एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. हाती लागलेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्तीला इंदिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची राजस्थान पोलीस आणि तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. या आरोपी व्यक्तीचीही कसून चौकशी केली जात आहे.

120 प्रश्न जसेच्या तसे?

या व्यक्तीचे नेमके नाव काय आहे, हे अद्याप समोर आलेले नही. परंतु नीटची परीक्षा रद्द झाल्यानंतर आता देशभरात संताप व्यक्त केला जात आहे. दिल्लीमध्ये पालक आणि विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. सरकारविरोधात मोठे आंदोलन केले जात आहे. 22 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा खेळ केला जातोय, असा आरोप होत आहे. नीट परीक्षेत पेपरफुटी झाली असल्याचा आरोप करताना साधारम बारा ते पंधरा महिन्यांआधीच एक संभाव्य प्रश्नपत्रिका मोठ्या प्रमाणावर प्रसारित झाली होती. ही संभाव्य प्रश्नपत्रिका 150 पानांची होती. त्यात एकूण 410 प्रश्न होते. त्यापैकी साधारण रसायनसास्त्र म्हणजेच केमिस्ट्रीचे 120 प्रश्न हे नीट परीक्षेतील प्रश्नांप्रमाणेच होते, असा दावा केला जातोय. आता यात नेमेक काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!