AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET Cancelled : नीट परीक्षा पुन्हा कधी? अत्यंत मोठी माहिती, थेट..

Neet cancelled 2026 : नुकताच विद्यार्थ्यांना मोठा दणका देत नीट परीक्षा रद्द करण्यात आली. नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडाली. हेच नाही तर पुढे नीट परीक्षा नक्की कधी असणार हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे.

NEET Cancelled : नीट परीक्षा पुन्हा कधी? अत्यंत मोठी माहिती, थेट..
Neet exam 2026 date
| Updated on: May 12, 2026 | 1:16 PM
Share

नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. नीट परीक्षा 2026 चा पेपर लीक झाल्याचा गंभीर आरोप होत होता. त्यानंतर हे मोठे पाऊल उचलण्यात आले. या पेपरफुटीचा तपास हा सीबीआयकडे सोपवण्यात आला. सीबीआयने आदेश देत थेट नीट परीक्षा 2026 ची सर्व प्रक्रिया थांबवण्याचे आदेश दिले. ज्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. सीबीआयकडून पेपरफुटीसंदर्भात तपास केला जात आहे. नक्की कुठे पेपरफुटी झाली, कोण कोण सहभागी आहे, किती केंद्रांवर पेपर फुटले, नक्की किती लोकांचा सहभाग आहे, याचा तपास केला जाईल. मात्र, यादरम्यान परीक्षा प्रक्रिया सुरू ठेवणे योग्य नसल्याचे स्पष्ट शब्दात सीबीआयने म्हटले. पेपरफुटीबाबत धक्कादायक माहिती मिळत आहे. मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. 3 मे 2026 रोजी देशभरात नीट परीक्षा 2026 घेण्यात आली. मात्र, पेपरफुटीचे आरोप केले जात होते. 10 लाखाच्या आसपास विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा नीट परीक्षा द्यावी लागणार आहे.

नीट परीक्षा 2026 रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नीट परीक्षा एकदाची झाली असताना पुन्हा विद्यार्थ्यांना अभ्यासाला सुरूवात करावी लागणार आहे. नीट परीक्षा पेपरफुटी संदर्भात मोठे आंदोलन दिल्लीत विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. शेवटी नीट परीक्षा 2026 ची पेपरफुटीची व्याप्ती बघता परीक्षा रद्द करण्याचे आदेश देण्यात आली.

एनटीएने स्पष्ट शब्दात सांगितले की, त्यांच्याकडून सीबीआयला तपासात सहकार्य केले जाईल. राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती गटाने (एसओजी) अनेक खुलासे केले आहेत. नीट परीक्षेच्या 15 ते 12 महिने आधीपासूनच NEET इच्छुकांमध्ये एक अंदाजित प्रश्नपत्रिका’ मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत होती. ही अंदाजपत्रिका 150 पानांची होती. त्यात अंदाजे 410 प्रश्न होती. त्यापैकी 120 प्रश्न नीट परीक्षेच्या रसायनशास्त्र विभागातील प्रश्नासारखीच होती.

नीट परीक्षेत राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणात पेपरफुटी झाल्याचे सांगितले जात आहे. नीट परीक्षा आता पुन्हा कधी आहे, हा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारला जात आहे. मात्र, अद्याप नीट परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाहीये. लवकरच नीट परीक्षेची तारीख जाहीर केली जाईल. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना झालेला नीट परीक्षेचा पेपर सोप्पा गेला होता, त्यांच्याकरिता हा मोठा दणका असणार आहे.

Follow Us
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......