AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठा दणका! थेट नीट परीक्षा 2026 रद्द, सीबीआयने आदेश काढत..

NEET Exam 2026 Cancelled : नुकताच मोठा निर्णय घेत घेत नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपरफुटीचे आरोप केले जात होते. शेवटी सीबीआयने चाैकशीचे आदेश देत थेट नीट परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला.

मोठा दणका! थेट नीट परीक्षा 2026 रद्द, सीबीआयने आदेश काढत..
NEET Exam Cancelled
| Updated on: May 12, 2026 | 12:41 PM
Share

नुकताच अत्यंत मोठा निर्णय घेण्यात आला. पेपर लीक झाल्यानंतर थेट नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आली. पेपर लीक झाल्यानंतर सीबीआयने या प्रकरणात थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश दिला आहे. पेपरफुटी प्रकरणात चाैकशीचे आदेश सीबीआयकडून देण्यात आले. संबंधित दोषींवर कारवाई केली जाणार आहे. नीट परीक्षा 2026 रद्द करण्यात आल्याने एकच मोठी खळबळ उडालीये. 3 मे रोजी नीट परीक्षाचा पेपर झाला होता. मात्र, त्यानंतर पेपरफुटीचे प्रकरण पुढे आले. 3 मे रोजी झालेली नीट परीक्षा रद्द करण्यात आली.  नीट परीक्षा 2026 प्रकरणी अखेर सीबीआयने चाैकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयकडून या प्रकरणी आता चाैकशी केली जाणार आहे. विद्यार्थी संभ्रमात आहेत. पेपरफुटीचा दणका विद्यार्थ्यांना बसताना दिसत आहे.

3 मे रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करण्यात आल्याने पुन्हा एकदा जवळपास 10 लाख विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे. राजस्थानमध्ये नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याचा आरोप केला जात होता. काही प्रकरणेही पुढे आली, ज्यानंतर सीबीआयने थेट परीक्षा रद्द करण्याचा आदेश जारी केला. पेपर फुटीच्या आरोपानंतर हे मोठे पाऊस उचलण्यात आले.

एनटीएने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले की, 8 मे रोजी या प्रकरणातील पडताळणी करण्यासाठी केंद्रीय यंत्रणांकडे तपास सोपवण्यात आला. तपास यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्याची परीक्षा प्रक्रिया पुढे चालू ठेवता येणार नाही, असा निष्कर्ष काढण्यात आला. राष्ट्रीय परीक्षा प्रणालीवरील विद्यार्थ्यांचा विश्वास टिकवून ठेवणे महत्वाचे आहे.

त्यामुळेच ही परीक्षा रद्द करण्याचा सर्वात कठीण निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने आता संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. तपास यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करतील आणि सर्व नोंदी, कागदपत्रे व इतर आवश्यक साहित्य पुरवले जाईल, असेही एनटीएने म्हटले आहे. कथित पेपरफुटीच्या नेटवर्कची व्याप्ती, त्यात कोण कोण सामील आहे आणि नक्की कुठे पेपरफुटी झाली आणि कशी झाली याचा सविस्तर तपास हा केला जाईल.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?