NEET Paper Leak : नीट परीक्षा रद्द झाल्याने बसला धक्का, तीन विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
NEET परीक्षेचा पेपर फुटल्याने आणि परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला. या नैराश्यातून दिल्ली, राजस्थान, गोव्यात 3 विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले. 21 जून रोजी आता पुनर्परीक्षा होणार असली तरी, या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण आणि पेपर फुटीचे गंभीर परिणाम समोर आले आहेत, ज्यामुळे भविष्याची चिंता वाढली आहे.

लाखो विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी नीट परीक्षा दिली. मात्र, या वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षेचा (NEET Exam) पेपर परीक्षेपूर्वीच फुटल्याने मोठी खळबळ माजली. अखेर ही परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बराच गदारोळ, आरोप प्रत्यारोप झाले. या पेपर फुटी प्रकरणाती मुख्य मा्सटरमाईंडलाही अटक झाली. अखेर परीक्षेची नवी तारीख जाहीर करण्यात आली असून 21 जून रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडणार आहे. मात्र या पेपर फुटी प्रकरणामुळे लाखो विद्यार्थ्यांना मोठा धक्का बसला अून तो सहन न झाल्याने देशातील विविध भागत 3 विद्यार्थ्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं समोर आलं आहे.
महत्त्वपूर्ण परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षाच त्यानंतर रद्द करण्यात आली. त्यामुळे अनेक विद्यार्थी निराश झाले, काहींना प्रचंड तणाव आला आणि त्यापायीच काहींनी आपलं अनमोल जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. याच नैराश्यातून उत्तर पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर भागातील नीटची परीक्षा दिलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. तिला या परीक्षेत चांगले गुण मिळण्याची अपेक्षा होती, मात्र परीक्षाच रद्द झाल्याने तिला मोठा धक्का बसला होता.
तर दुसरीकडे राजस्थानच्या सिकर मधील एका 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही आपलं आयुष्य संपवल्याचं उघड झालं. त्याने यापूर्वी 2 वेळा ही परीक्षा दिली होती, मात्र यंदा परीक्षेत उत्तम गुण मिळतील असा विश्वास त्याला होता. पण पेपर फुटीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली, याचा त्याला मोठा मानसिक धक्का बसला होता. त्यातूनच त्याने हे पाऊल उचललं असावं असा संशय व्यक्त होत आहे.
या घटनांपाठोपाठ गोव्यातही एका 18 वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या करत आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे प्रचंड खळबळ माजली आहे.
मास्टरमाइंडला अटक
दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयला सर्वात मोठं यश मिळालं. नीट पेपरफुटी प्रकरणातील मास्टमाइंड असलेल्या पी. व्ही.कुलकर्णी याला अटक सीबीआयने अटक केली. सीबीआयकडून मिळालेल्या माहितीनुसार कुलकर्णी हाच नीट पेपर लीक प्रकरणातील मास्टमाइंड आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पीव्ही कुलकर्णी हा पुण्यात केमिस्ट्री लेक्चरर होता. तो नीट परीक्षा 2026 शी संबंधित होता. दरम्यान या प्रकरणात आरोपी असलेल्या मनीषा वाघमारेला 14 मे रोजीच सीबीआयने अटक केली आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे संपूर्ण देशभरात पसरले आहेत. या प्रकरणात आता सीबीआयकडून सखोल चौकशी सुरू आहे.