Nepal Plane Missing : नेपाळमधून झेपावलेल्या विमानाचा संपर्क तुटला! विमानात 4 भारतीयांसह एकूण 22 प्रवासी

या विमानामध्ये 19 प्रवासी असल्याचं सांगितलं जात होतं. सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी या विमानाचं उड्डाण झालं होतं. 9 NAET ट्वीन इंजिन असलेलं हे विमान तारा एअरलाईन्स कंपनीचं होतं. थोड्या वेळानंतर या विमानात एकूण 22 प्रवासी असल्याचं स्पष्ट झालं. यात एकूण चार भारतीय प्रवाशांचा समावेश आहे.

Nepal Plane Missing : नेपाळमधून झेपावलेल्या विमानाचा संपर्क तुटला! विमानात 4 भारतीयांसह एकूण 22 प्रवासी
| Updated on: May 29, 2022 | 12:00 PM

नवी दिल्ली : 22 प्रवाशांना घेऊन निघालेलं विमान बेपत्ता झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. नेपाळमधील हे विमान (Nepal Plane Missing) 22 प्रवाशांना घेऊन झेपावलं होतं. मात्र या विमानाशी आता कोणताही संपर्क होऊ शकत नसल्यानं मोठ्या दुर्घटनेची भीती व्यक्त केली जातेय. एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. विशेष म्हणजे 22 प्रवाशांमध्ये 4 भारतीय होते, अशीही माहिती समोर आली आहे. स्थानिक वृत्तवाहिन्यांच्या हवाल्यानं एएनआय वृत्त संस्थेनं याबाबतची माहिती दिली आहे. नेपाळ गृहमंत्रालयाकडून (Nepal Home Ministry) दोन खासगी हेलिकॉप्टर शोधकार्यासाठी तैनात करण्यात आली आहे. नेपाळच्या सैन्याकडूनही शोध कार्य केलं जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुस्तंग येथील स्थानिक जिल्हा पोलीस अधिकारी राम कुमार दानी यांनी शोध मोहिम सुरु करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. हे एअरक्राफ्ट जॉमसॉमच्या हवाई हद्दीत मुस्तंग इथं शेवटचं पाहिलं गेलं होतं. त्यानंतर ते डायवर्ट झालं. इथूनच या एअरक्राफ्टचा संपर्क तुटला. तेव्हापासून या एअरक्राफ्टशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जातोय. पण संपर्क होऊ न शकल्यामुळे आता स्थानिक यंत्रणेकडून शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक प्रतिनिधींनी दिली आहे. मुस्तंग जिल्ह्याचे प्रमुख अधिकार असलेल्या नेत्रा प्रसाद शर्मा यांनी एएनआशी बोलताना या विमानाबाबत माहिती दिलीय.

सुरुवातीला या विमानामध्ये 19 प्रवासी असल्याचं सांगितलं जात होतं. सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी या विमानाचं उड्डाण झालं होतं. 9 NAET ट्वीन इंजिन असलेलं हे विमान तारा एअरलाईन्स कंपनीचं होतं. थोड्या वेळानंतर या विमानात एकूण 22 प्रवासी असल्याचं स्पष्ट झालं. यात एकूण चार भारतीय प्रवाशांचा समावेश आहे. तर तीन जॅपनीज प्रवासी असून अन्य 15 प्रवासही नेपाळमधीलच आहे. या पायलट आणि विमानातील क्रू मेंमर्सचाही समावेश आहे, अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.