Monsoon: जूनमध्ये मान्सूनची एन्ट्री ठरलेलीच..! पण मुसळधार पावसाचे गुपित काय? पर्वत रांगांचा पर्जन्यमानावर परिणाम काय ?

Monsoon: जूनमध्ये मान्सूनची एन्ट्री ठरलेलीच..! पण मुसळधार पावसाचे गुपित काय? पर्वत रांगांचा पर्जन्यमानावर परिणाम काय ?

पावसाळ्यातील एका महिन्यात असे 3 ते 4 ‘मॉन्सून चक्रवात’ निर्माण होतात व मार्गात आलेल्या क्षेत्रावर विपुल पर्जन्य पाडतात. चक्रवाताच्या नैर्ऋत्य वर्तुळखंडात अधिकतम पाऊस पडतो. मॉन्सून चक्रवातांमुळे भारतीय पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचे प्रमाण वाढते. तथापि मॉन्सून चक्रवात निर्माण होण्याचे स्थान, त्यांची संख्या, त्यांचे गमन मार्ग व त्यांची तीव्रता यांमध्ये प्रतिवर्षी बदल होत असल्यामुळे भारतावरील एकूण पर्जन्यवृष्टीतही बदल झालेला आढळतो.

राजेंद्र खराडे

|

May 29, 2022 | 6:15 AM

मुंबई : भारतामध्ये दाखल होणाऱ्या (Monsoon) मान्सूनचा प्रवास हा थक्क करणारा आहे. असे असले तरी याच पावसावर भारतीय अर्थव्यवस्था ज्या (Farming) शेती व्यवसयावर अवलंबून त्या शेतीला खरा आधार हा मान्सूनचा आहे. विषुववृत्त ओलांडल्यानंतर भारतावरील अभिसारी परिसंचरणात हवा ओढली जाते. त्याचप्रमाणे ती आग्नेय चीनपर्यंतच्या आग्नेय आशियातील द्वीपसमूहावर जाते. हा वातप्रवाह (Himalayan Mountains) हिमालय पर्वतामुळे अडविला जाऊन हिमालयाच्या पायथ्याशी पर्जन्यमान वाढते पण उत्तरेकडील तिबेट पठार मात्र कोरडे राहते. भारतातील सर्वाधिक वार्षिक पर्जन्य 1 हजार 25 सेंमी. हून अधिक आसाम व पूर्व हिमालयात पडतो. तर महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेच्या आंबोली घाटात. देशभरातील पर्वतरांगा तसेच हिमालय हे पर्जन्यमानाच्या कमी जास्तीसाठी सर्वाधिक परिणामकारक आहेत. पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेला भाग कायमच शेतीसाठी सधन राहिलेला आहे. तर पर्जन्यछायेच्या भागात सातत्याने पाण्यासाठी वणवाच राहलेला आहे.

मान्सूनमुळेच सुटतो अन्नधान्याचा प्रश्न

पावसाळ्यातील एका महिन्यात असे 3 ते 4 ‘मॉन्सून चक्रवात’ निर्माण होतात व मार्गात आलेल्या क्षेत्रावर विपुल पर्जन्य पाडतात. चक्रवाताच्या नैर्ऋत्य वर्तुळखंडात अधिकतम पाऊस पडतो. मॉन्सून चक्रवातांमुळे भारतीय पश्चिम किनारपट्टीवरही पावसाचे प्रमाण वाढते. तथापि मॉन्सून चक्रवात निर्माण होण्याचे स्थान, त्यांची संख्या, त्यांचे गमन मार्ग व त्यांची तीव्रता यांमध्ये प्रतिवर्षी बदल होत असल्यामुळे भारतावरील एकूण पर्जन्यवृष्टीतही बदल झालेला आढळतो. भारतीय अर्थव्यवस्थेत व भारताची अन्नधान्य समस्या सोडविण्यात मॉन्सूनच्या पावसाचा महत्त्वाचा वाटा असतो. भारताला मिळणाऱ्या वार्षिक पर्जन्यापैकी ७० टक्के पर्जन्य नैर्ऋत्य मॉन्सूनच्या कालावधीत मिळतो

पावासामध्ये कमी-अधिकपणा

नैर्ऋत्य मॉन्सून ऋतू म्हणजे भारतीय पावसाळी ऋतू. भारतातील पर्वतरांगांची दिक्‌स्थिती व भूमिस्वरूप या दोन घटनांचा भारतीय पर्जन्याच्या वितरणावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. सह्याद्रीच्या पश्चिमेकडील किनारपट्टीवर, आसामच्या डोंगराळ प्रदेशावर व हिमालयाच्या पायथ्याच्या प्रदेशावर अतिशय पाऊस पडतो, तर डोंगरांच्या वातविमुख भागांवर पर्जन्यछाया म्हणजेच पावसाचे प्रमाण कमी असलेले भाग निर्माण होतात.

हे सुद्धा वाचा

महाराष्ट्रात सर्वाधिक सह्याद्री पर्वत रांगेत

आंबोली गाव हे सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसलेले असले तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. आंबोली घाटामुळेच या गावाला आंबोली हे नाव पडलेले आहे. इथे वर्षाकाठी सरासरी 7 हजार 500 मिमी पाऊस पडतो. या पर्वत रांगामध्ये सातत्याने धुके तसेच अनेक जातीच्या दुर्मिळ प्राणी पक्ष्यांचे वास्तव्य असणारे आंबोली हे गाव जगातील काही मोजक्या जैवविविधता केंद्रांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील महत्वाचा असा हा घाटमार्ग असून पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकला जोडणाऱ्या या घाट मार्गातून प्रवास करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. ज्याप्रमाणे देशात सर्वाधिक पाऊस आसामच्या डोंगराळ भागात पडतो तीच अवस्था महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें