AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IRCTC ने ट्रेनमध्ये आणला विमानतळाचा नियम, जास्त सामानासाठी लागणार अतिरिक्त शुल्क

नव्या नियमानुसार, लोकांना विमानतळाप्रमाणेच ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. जाणून घेऊया.

IRCTC ने ट्रेनमध्ये आणला विमानतळाचा नियम, जास्त सामानासाठी लागणार अतिरिक्त शुल्क
Railway RuleImage Credit source: TV 9 Marathi
| Edited By: | Updated on: Dec 19, 2025 | 11:44 PM
Share

तुम्हाला आता विमानातले नियम ट्रेनमध्ये दिसले तर आश्चर्य वाटायला नको. तुम्ही अनेकदा भारतीय रेल्वेने प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्वाची ठरणार आहे. वास्तविक, आयआरसीटीसीने आता रेल्वेमध्ये सामान घेऊन प्रवास करण्यासाठी नवीन नियम आणले आहेत. या नव्या नियमानुसार, लोकांना विमानतळाप्रमाणेच ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले की, जर एखादा प्रवासी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन प्रवास करत असेल तर त्याला विमान प्रवासाप्रमाणेच अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. चला जाणून घेऊया सविस्तर माहिती.

ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्यासाठी अतिरिक्त शुल्क

ज्याप्रमाणे विमानतळावर एका मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेल्यास तुम्हाला अतिरिक्त शुल्क द्यावे लागत आहे, त्याच प्रमाणे आता रेल्वेमध्ये प्रवासादरम्यान सामान वाहून नेण्यासाठी तुम्हाला अतिरिक्त शुल्क आकारावे लागणार आहे. सध्या ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डब्यानुसार (क्लास) सामानाची कमाल मर्यादा आहे. प्रवासी निर्धारित मर्यादेपर्यंत डब्यात सामान घेऊन जाऊ शकतात. यात मोफत भत्त्याचाही समावेश आहे. जर प्रवाशांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेले तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. ही मर्यादा काहीशी अशी आहे.

ट्रेनमध्ये सामान वाहून नेण्याची कमाल मर्यादा खालीलप्रमाणे

  • एसी फर्स्ट क्लास – 150 किलो
  • प्रथम श्रेणी – 100 किलो
  • एसी 3 टायर – 40 किलो
  • स्लीपर क्लास – 80 किलो
  • द्वितीय श्रेणी – 70 कि.ग्रा.

मर्यादेपेक्षा जास्त सामान वाहून नेण्यासाठी किती शुल्क?

प्रवाशांनी निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त सामान घेऊन ट्रेनमध्ये प्रवास केला तर त्यांना अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. यासाठी त्यांना लगेज रेटच्या 1.5 पट फी भरावी लागेल. हे शुल्क केवळ वर्गानुसार निश्चित केलेल्या कमाल मर्यादेपर्यंतच लागू आहे. रेल्वेच्या

नियमांनुसार, प्रवासी ट्रंक, सूटकेस आणि बॉक्स घेऊन जाऊ शकतात, ज्याचा जास्तीत जास्त आकार 100 सेमी x 60 सेमी x 25 सेमी असावा. ट्रंक, सुटकेस किंवा बॉक्सचा आकार या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास प्रवासी त्यांना ट्रेनमध्ये नेऊ शकणार नाहीत. ब्रेक व्हॅन (SLR) किंवा पार्सल व्हॅनमध्ये असा माल बुक करणे आवश्यक असेल. या व्यतिरिक्त, प्रवाशांसाठी वैयक्तिक सामान म्हणून डब्यामध्ये व्यवसायाशी संबंधित वस्तू नेण्याची परवानगी नाही.

Follow Us
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?
लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
Mayank Lohar | लोकल ट्रेन हत्या प्रकरणी सर्वात मोठी अपडेट समोर; SIT पथकाने चक्क...
धक्कादायक! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट
Shirdi | साईबाबांच्या नगरीत धक्कादायक खुलासा! प्रसादाच्या नावाखाली काय विकलं जात होतं?; 500 किलो निकृष्ट पेढे...
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णय
लग्नपत्रिकेवर आता नवरदेव-नवरीची जन्मतारीख? महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाची चर्चा
स्वार्थासाठी गेले, जनता हिशोब चुकता करणार! नाईकांचा खासदारांना इशारा
Vaibhav Naik | स्वार्थासाठी गेले, आता जनता हिशोब चुकता करणार! वैभव नाईकांचा फुटीर खासदारांना इशारा
विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट
Beed | विलास घुले प्रकरणात सर्वात मोठी अपडेट, हत्येच्या तपासासाठी सरकारने थेट निर्णय घेतला; लवकरच...
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं!
निलेश राणे, तुझी तरी काय लायकी?; सावंतांनी राणेंना सुनावलं! त्या वादाला आता नवं वळण!
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता
एकनाथ शिंदेंनी... दोन्ही शिवसेनेचं विलिनीकरण होणार? बच्चू कडूंनंतर आता बड्या नेत्याचं विधान चर्चेत