राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या ‘त्या’ प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?

| Updated on: Jan 25, 2021 | 5:18 PM

राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर या प्रतिमेविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली. | Netaji Subhash Chandra Bose

राष्ट्रपती भवनातील नेताजींच्या त्या प्रतिमेवरुन वादंग; सुभाषचंद्र बोसांऐवजी अभिनेत्याचे चित्र?
प्रसनजीत चॅटर्जी याने नेताजी सुभाषचंद्र यांच्या जीवनावर आधारित 2019 साली प्रदर्शित झालेल्या 'गुमनामी' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. राष्ट्रपती भवनात लावण्यात आलेले चित्र प्रसनजीत चॅटर्जी यांचा असल्याचे सांगितले जात आहे.
Follow us on

नवी दिल्ली: राष्ट्रपती भवनात नेताजी सुभाषचंद्र बोस (Subhash Chandra Bose) यांच्या प्रतिमेचे नुकतेच अनावरण करण्यात आले. मात्र, आता या प्रतिमेवरुन वादंग निर्माण झाला आहे. हे छायाचित्र नेताजी बोस यांचे नसून त्यांच्या चरित्रपटातील एका अभिनेत्याचे आहे, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. (President Kovind unveiled Netaji Shbhas Chandra bose painitng and not any actor)

केंद्र सरकारने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती देशभरात ‘पराक्रम दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय नुकताच जाहीर केला होता. यानिमित्ताने राष्ट्रपती भवनात रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नेताजींच्या एका प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियावर या प्रतिमेविषयी प्रचंड चर्चा सुरु झाली.

या प्रतिमेतील व्यक्ती नेताजी नसून बंगाली अभिनेता प्रसनजीत चॅटर्जी असल्याचा दावा केला जात आहे. प्रसनजीत चॅटर्जी याने नेताजी सुभाषचंद्र यांच्या जीवनावर आधारित 2019 साली प्रदर्शित झालेल्या ‘गुमनामी’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. राष्ट्रपती भवनात लावण्यात आलेले चित्र प्रसनजीत चॅटर्जी यांचा असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, भाजपकडून हे वृत्त फेटाळण्यात आले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबीयांनी हा फोटो पद्मश्री पुरस्कार विजेते चित्रकार परेश मैती यांना दिला होता. या फोटोवरून परेश मैती यांनी नेताजींचे पोर्ट्रेट काढले होते. त्यामुळे या प्रतिमेचा आणि प्रसनजीत चॅटर्जी यांचा काहीही संबंध नाही. हा वाद निरर्थक आहे, असे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले.

‘आता देवच भारताला वाचवू शकतो’

या वादाच्या पार्श्वभूमीवर नेटकरी आणि विरोधकांनी भाजपला लक्ष्य केले. तृणमूल काँग्रेसच्या खासदार माहूआ मोईत्रा यांनीही ट्विटरवरुन यासंदर्भातील आक्षेप नोंदवला. “आता देवच भारताला वाचवू शकतो (सरकार नक्कीच काही करु शकत नाही)”, असे म्हटले.
तर वरिष्ठ पत्रकार बरखा दत्त यांनाही ट्विटवरुन हा फोटो पाहून धक्का बसल्याचं मत नोंदवलं आहे. हा प्रकार खूपच लाजिरवाणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

‘माझ्या वडिलांना हवा तो सन्मान मिळाला नाही’, सुभाषचंद्र बोस यांच्या मुलीची खदखद

‘राजकारणासाठी कोरोना लस व्यतिरिक्त अनेक व्यासपीठ, या दोन हात करु’, अमित शाहांचं विरोधकांना थेट आव्हान

काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवली; साक्षी महाराजांचं वादग्रस्त विधान

(President Kovind unveiled Netaji Shbhas Chandra bose painitng and not any actor)