
एका माजी एअर होस्टेसने प्रवाशांना विमानात मिळणारं पाणी, कॉफी आणि चहाचं सेवन करताना अतिरिक्त सावधानीचा इशारा दिला आहे. एअर होस्टसने केवळ प्रवाशांना सतर्क राहण्यासच सांगितलं नाही तर त्या मागचं कारण देखील सांगितलं आहे. हे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. एअर होस्टेसने जे कारण सांगितलं ते ऐकून तुम्ही देखील विमानात मिळणारं पाणी, चहा, कॉफी घेताना एकदा नाही तर अनेकदा विचार कराल. मिररच्या रिपोर्टनुसार लांब पल्ल्याच्या फ्लाईटमध्ये स्वत:ला हायड्रेटेड ठेवण्यासाठी गरम चहा किंवा थंड पाणी पिणं हे स्वभाविक आहे. मात्र एका माजी एअर होस्टेसने असं म्हटलं आहे की, उड्डाणाच्या वेळी अशा प्रकारच्या पेयाचं सेवन तुमच्या शरीरासाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे प्रवाशांनी सावधानी बाळगावी. माजी फ्लाइट अटेंडेंट कॅट कमलानी हिने आपल्या टिकटॉकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे, त्यामध्ये त्यांनी या मागचं कारण सांगितलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक लोकांनी पाहिलं आहे.
या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी आपला एक जुना अनुभव शेअर केला आहे. आम्ही एअर होस्टेस जेव्हा विमानात तुम्हाला चहा, पानी किंवा कॉफी सारखे पदार्थ देतो तेव्हा तुम्ही त्याचं सेवन करू नये, त्याऐवजी तुम्ही पिण्यासाठी नेहमी बाटली बंद पाण्याचाच वापर करावा. विमानात प्रवास करताना अशा कोणत्याच लिक्विडचं सेवन करू नका, जे बाटलीमध्ये बंद असणार नाही, किंवा उघडं असेल. त्याचं कारण म्हणजे तुम्हाला जिथून हे पाणी दिलं जातं, ते टँक खूप अस्वच्छ असतात, त्यांची नियमितपणे स्वच्छता केली जात नाही. विमानामध्ये असलेल्या पाण्याच्या टाकीची स्वच्छता ही खूप कमी वेळा केली जाते. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची घाण देखील अनेक वेळा आढळून येते, हे ऐकून तुम्हाला धक्का बसला असेल मात्र हे सत्य आहे, असं कमलानी यांनी म्हटलं आहे.
पुढे या व्हिडीओमध्ये या एअर होस्टेसने असं देखील म्हटलं आहे की, त्याच पाण्यापासून चहा आणि कॉफी देखील तयार होते, त्यामुळे विमानात कधीही आम्ही तुम्हाला जी कॉफी, चहा किंवा पाणी देतो ते कधीही पिलं नाही पाहिजे, त्याऐवजी पाणी पिण्यासाठी तुम्ही नेहमी बाटली बंद पाण्याचाच वापर केला पाहिजे. अनेकदा तर विमानातील पाण्याच्या टाक्या या जिथे शैचालय आहे, त्याच्याच जवळ असतात. त्यामुळे शक्यतो असं पाणी पिणं टाळावं असं या एअर होस्टेसने म्हटलं आहे.