AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे (Corona Cases in India 24 hours)

Corona Cases in India | देशात एकूण कोरोनाबळींचा आकडा तीन लाखांपार, एका दिवसात 4400 हून अधिक मृत्यू
corona
| Updated on: May 24, 2021 | 9:43 AM
Share

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 18 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 22 हजार 315 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या सव्वादोन लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 4 हजार 454 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण घटले असले, तरी कोरोनाबळींच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. (New 222315 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 22 हजार 315 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 454 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 2 हजार 544 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 67 लाख 52 हजार 447 वर गेला आहे. देशात 2 कोटी 37 लाख 28 हजार 11 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 3 हजार 720 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 27 लाख 20 हजार 716 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 60 लाख 51 हजार 962 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,22,315

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,02,544

देशात 24 तासात मृत्यू – 4,454

एकूण रूग्ण – 2,67,52,447

एकूण डिस्चार्ज – 2,37,28,011

एकूण मृत्यू – 3,03,720

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 27,20,716

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,60,51,962 (Corona Cases in India 24 hours)

संबंधित बातम्या :

Covid-19 Vaccine: जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल

Coronavirus: मास्क घालून बोलण्यात अडचण येतेय, मग हा मास्क पाहाच

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.