Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 17 हजारांनी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 65 लाख 30 हजार 132 वर गेला आहे. (Corona Cases 24 hours)

Corona Cases in India | देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत 17 हजारांनी घट, कोरोनाबळींची संख्याही कमी
Corona
Follow us
| Updated on: May 23, 2021 | 9:58 AM

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे (Corona Cases in India) सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल 17 हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात 2 लाख 40 हजार 842 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात 3 हजार 741 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे. (New 240842 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 40 हजार 842 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 741 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 3 लाख 55 हजार 102 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 कोटी 65 लाख 30 हजार 132 वर गेला आहे. देशात 2 कोटी 34 लाख 25 हजार 467 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 2 लाख 99 हजार 266 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 28 लाख 5 हजार 399 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 19 कोटी 50 लाख 4 हजार 184 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,40,842

देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,55,102

देशात 24 तासात मृत्यू – 3,741

एकूण रूग्ण – 2,65,30,132

एकूण डिस्चार्ज – 2,34,25,467

एकूण मृत्यू – 2,99,266

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 28,05,399

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,50,04,184 (Corona Cases 24 hours)

संबंधित बातम्या :

कोरोनामुक्त झालेल्या मधुमेहाच्या रुग्णांनी ही काळजी घ्यावी! ब्लॅक फंगसचा संसर्ग टाळण्यासाठी तज्ज्ञांनी दिला सल्ला

‘कोरोनाची लसचं नव्या व्हेरियंट्सना कारणीभूत’, नोबेल विजेत्या फ्रेंच प्रोफेसरचा धक्कादायक दावा

(New 240842 Corona Cases in India in the last 24 hours)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.