यंदाच्या ख्रिसमसला मोदी सरकारकडून खास भेट, 8 कोटी शेतकऱ्यांना लाभ

| Updated on: Dec 22, 2020 | 3:15 PM

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे आतापर्यंत केंद्र सरकारकडून 6 हप्ते देण्यात आले आहेत. आता 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस दिवशी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

यंदाच्या ख्रिसमसला मोदी सरकारकडून खास भेट, 8 कोटी शेतकऱ्यांना लाभ
पीएम किसान सन्मान निधी
Follow us on

नवी दिल्ली:  मोदी सरकार देशातील शेतकऱ्यांना ख्रिसमस दिवशी मोठी भेट देणार आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा सातवा हप्ता 25 डिसेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी घोषणा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गेल्या आठवड्यात केली होती. त्यामुळे देशभरातील 8 कोटी शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. यासाठी केंद्र सरकारकडून एकूण 18 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. (7th installment of the PM Kisan Scheme will be received on Christmas)

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेद्वारे केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम वर्षातून 3 हप्त्यात देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत केंद्र सरकारकडून 6 हप्ते देण्यात आले आहेत. आता 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमस दिवशी योजनेचा 7वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

18 हजार कोटी रुपये लागणार

केंद्र सरकारच्या या योजनेचा 7वा हप्ता देण्यासाठी केंद्र सरकारला जवळपास 18 हजार कोटी रुपयांची गरज भासणार आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षातील पहिला हप्ता 1 डिसेंबर ते 31 मार्च या दरम्यान दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलै आणि तिसरा हप्ता 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबरदरम्यान देण्यात येतो. या योजनेच्या माध्यमातून एकूण 18 हजार कोटी रुपये थेट 8 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

लाभ मिळत नसेल तर काय कराल?

पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे तुम्ही लाभार्थी आहात, पण तुम्हाला हप्ता मिळत नसेल किंवा या योजनेबाबत कुठली तक्रार असल्यास आपण केंद्र सरकारने दिलेल्या हेल्पलाईनवर फोन करु शकतो. 011-24300606 हा या योजनेचा हेल्पलाईन नंबर आहे. तुम्ही या नंबरवर तक्रार नोंदवू शकता किंवा योजनेच्या रकमेबाबत विवरण मागवू शकता. पंतप्रदान शेतकरी सन्मान योजनेच्या हप्ताची रक्कम तुम्हाला मिळाली नाही आणि फंड ट्रान्सफर ऑर्डर (FTO) दाखवत असेल तर तुम्हाला लवकरच हप्त्याची रक्कम मिळेल, असा त्याचा अर्थ होतो.

संबंधित बातम्या:

अलिगढ मुस्लिम विद्यापीठात ‘मिनी इंडिया’, मोदींकडून पुन्हा ‘सबका साथ’चा नारा

Kisan Credit Card | आता तीन कागदपत्रांद्वारे मिळणार शेतकरी क्रेडिट कार्ड; कार्डावर मिळणार ‘इतकं’ कर्ज

7th installment of the PM Kisan Scheme will be received on Christmas