AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोमधून ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, मग मेट्रो चालणार तरी कशी?

metro new project in delhi: दिल्ली मेट्रोचे पूर्ण स्वयंचलित नेटवर्क सध्या 97 किमी लांब आहे. आता या महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्ली मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित होणार असल्याचे दिल्‍ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले.

मेट्रोमधून ड्रायव्हरचे कॅबिन काढणार, मग मेट्रो चालणार तरी कशी?
Metro
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jun 16, 2024 | 9:45 AM
Share

मेट्रो सर्वाधिक लोकप्रिय झालेला शहरातील वाहतुकीचा प्रकार आहे. मेट्रोमध्ये आता अनेक अद्यावत बदल होत आहे. दिल्ली मेट्रोने सर्वात मोठा बदल केला आहे. या मेट्रोमधून ड्रायव्हरचे (चालक) कॅबिनच काढण्यास सुरुवात केली आहे. मग ड्रायव्हर कुठे बसून मेट्रो चालवणार? असा प्रश्न तुम्हाला पडला असणार…पण मेट्रो आता चालकाविना धावणार आहे. पूर्णपणे स्वंयचलित पद्धतीने मेट्रो धावणार आहे. जून महिन्याच्या शेवटपर्यंत ही स्वयंचलित मेट्रो धावणार आहे. सध्या ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनमध्ये एक अटँडेंट असणार आहे. परंतु कालांतराने अटँडेटसुद्धा असणार आहे.

ड्रायव्हर कॅबिन नसल्यामुळे काय फायदा

मेट्रोत ड्रायव्हरचे कॅबिन काढल्यानंतर ट्रेन पूर्ण स्वयंचलित असणार आहे. यामुळे मेट्रोच्या ट्रेनमधील प्रवाशांसाठी जास्त जागा उपलब्ध होतील. मेट्रोमध्ये ड्रायव्हरचे कॅबिन मागे अन् पुढे असे दोन्ही बाजूने असते. सध्याच्या लाईनवर धावणारी मेट्रो आणि पिंक लाईनवर धावणारी मेट्रोही ड्रायव्हरलेस असणार आहे. मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे मानवी चुका टळतात. ट्रेनचे संचालन करणे सोपे असते. दिल्ली मेट्रोनंतर हा पर्याय मुंबई अन् पुणे मेट्रोत येणार आहे.

सध्या 97 किमी लांब

दिल्ली मेट्रोचे पूर्ण स्वयंचलित नेटवर्क सध्या 97 किमी लांब आहे. आता या महिन्याच्या शेवटपर्यंत दिल्ली मेट्रो पूर्णपणे स्वयंचलित होणार असल्याचे दिल्‍ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून सांगण्यात आले. 16 मेट्रोमधून ड्रायव्हरची कॅबिन काढली जाणार आहे. यामुळे प्रवाशांसाठी जास्त जागा मिळणार आहे. तसेच दिल्‍ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन ट्रेन अटँडेंट टप्पाटप्याने काढण्यात येणार आहे. तीन, चार ट्रेन मिळून एक अटँडेट ठेवण्यात येणार आहे.

2020 पासून ड्रायव्हरलेस ऑपरेशन

मैजेंटा लाइन (जनकरपुरी वेस्‍ट ते बॉटेनिकल गार्डन) वर ड्रायव्हरलेस मेट्रो डिसेंबर 2020 मध्ये सुरु झाली. नोव्हेंबर 2021 मध्ये पिंक लाईनवर ड्रायव्हरलेस मेट्रो सुरु झाली. जेव्हा ड्रायव्हरलेस ऑपरेशन सुरू झाले तेव्हा मेट्रो ट्रेनवर एक अटँडेंट होता. आपत्कालीन परिस्थिती मेट्रो ट्रेन सांभाळण्यासाठी ही नियुक्ती केली गेली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी