संसदेतील गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन; संसदेत शिरणारा ‘या’ जिल्ह्यातील

Parliament Winter Session 2023 : संसदेतील गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन... संसदेत शिरणारा 'या' जिल्ह्यातील... संसदेत नेमकं काय झालं? संसदेच्या अधिवेशनावेळी गोंधळ कसा काय झाला? धूर, फटाके अन् एकच गोंधळ... देशाच्या संसदेत नेमकं काय घडलं? वाचा सविस्तर..

संसदेतील गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन; संसदेत शिरणारा 'या' जिल्ह्यातील
Follow us
| Updated on: Dec 13, 2023 | 2:20 PM

संदिप राजगोळकर, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी, नवी दिल्ली : अवघ्या भारताला हादरवून सोडणारी बातमी समोर आली आहे. संसदेचं अधिवेशन सुरु असताना दोन व्यक्तींनी संसद परिसरात गोंधळ घातला. या दोघांनी आधी संसदेबाहेर फटाके फोडले. त्यानंतर दोघेही लोकसभेत गेले. तिथे त्यांनी व्यक्ती लोकसभेत जात गोंधळ घातला. प्रेक्षक गॅलरीतून दोघांनी उड्या मारल्या आणि सभागृहात एकच गोंधळ उडाला. संसदेतील या गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं आहे. संसदेत शिरणारा महाराष्ट्रातील आहे. संसदेत गोंधळ घालणारी व्यक्ती महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील आहे, अशी माहिती समोर आली आहे.

संसदेतील गोंधळाचं महाराष्ट्र कनेक्शन

संसदेत जात दोन व्यक्तींनी गोंधळ घातला. यातील एक व्यक्ती आपल्या महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. ही व्यक्ती लातूर जिह्यातील असल्याची माहिती आहे. अमोल शिंदे असं या व्यक्तीचं नाव आहे. या दोन व्यक्तींनी जेव्हा गोंधळ घातला. तेव्हा भारत माता की जय, संविधान बचावच्या घोषणा देण्यात आल्या.

संसदेत गोंधळ नेमकं काय झालं?

संसदेचं कामकाज सुरु असताना दोन अज्ञात व्यक्तींनी लोकसभेत उडी घेतली. प्रेक्षक गॅलरीतून अज्ञातांनी लोकसभेत उडी मारली. यावेळी त्यांच्याकडे स्मोक कँडल होती. अज्ञातांनी स्मोक कँडल वापरल्याने मंत्री आणि खासदारांचा गोंधळ उडाला. त्यानंतर सगळे खासदार सभागृहाबाहेर पडले.

लातूरमधील अमोल शिंदे नावाचा तरूण ताब्यात घेण्यात आलं आहे. संसदेच्या बाहेर निदर्शनं करणारी नीलम नावाची महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. हरयाणातील महिला पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्या लोकांनी गोंधळ घातला. ते मैसूरचे प्रतापराव सिंह खासदाराच्या पासवर हे लोक संसदेत आले होते. तर मध्यप्रदेशमधील खासदारांच्या मदतीने हे पास बनवण्यात आले होते. या प्रकरणाची आता आयबी टीमकडून चौकशी होत आहे. काही वेळासाठी संसदेचं कामकाज स्थगित केलं गेलं .

महाराष्ट्र अलर्टवर

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचंही सध्या अधिवेशन सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात विधानभवनाचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.महाराष्ट्रात सभागृहात येण्यासाठी एका आमादाराच्या पासवर केवळ दोघांनाच सभागृहात येता येणार आहे.

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.