New Parliament Event: महंतांनी दिले सेंगोल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलचा इतिहासच सांगितला…

| Updated on: May 28, 2023 | 12:55 AM

सेंगोल यांच्याकडे सत्ता हस्तांतरणाबाबत पुरावे म्हणून कागदपत्रे नसल्याचा दावा काँग्रेसने केला. यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

New Parliament Event: महंतांनी दिले सेंगोल, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंगोलचा इतिहासच सांगितला...
Follow us on

नवी दिल्ली : नव्या संसद भवनाच्या उद्घाटन समारंभाच्या एक दिवस आधी महंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सेंगोल सुपूर्द केले. चेन्नईतील अनेक पुजारी शनिवारी दिल्लीत दाखल झाले होते, अधानमच्या पुजाऱ्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानी भेट घेतली आणि पंतप्रधानांनी त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी कार्यक्रमाला संबोधित करताना नरेंद्र मोदी म्हणाले की सेंगोलला आज त्याचे योग्य स्थान मिळत आहे. तामिळनाडू हा प्रत्येक कालखंडात राष्ट्रवादाचा बालेकिल्ला राहिला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.  तामिळ लोकांचे स्वातंत्र्यातील योगदान विसरले गेल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी बोलून दाखवले.आम्ही आनंद भवनातून पवित्र सेंगोल येथे आणले आहे.

काही लोक या सेंगोलला काठी म्हणत. या सेंगोलने गुलामगिरीच्या प्रत्येक चिन्हापासून स्वातंत्र्याला प्रारंभ झाला आहे. आता हे सेंगोल आपल्याला पुढे जाण्यासाठी एक वेगळी प्रेरणा देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

भारत जितका अखंड असेल तितका तो मजबूत असणार आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या संस्कृतीत सेंगोलला खूप महत्त्व असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनी सांगितले की, उद्या संसद भवनात पवित्र सेंगोलची स्थापना केली जाणार आहे. याआधी सेंगोलला योग्य मान मिळाला नव्हता, ती काठी म्हणूनच संग्रहालयात ठेवण्यात आली होती. सेंगोल हे आता देशाच्या कल्याणाचे प्रतीक बनणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी 8.30 ते 9 या वेळेत सेंगोलची चावी नव्या संसदेच्या लोकसभेत बसवली जाणार आहे.तर नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान मोदी लोकसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ ‘सेंगोल’ (राजदंड) ठेवणार आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी प्रथम ब्रिटीशांकडून सेंगोल मिळवले होते.

हे सत्ता हस्तांतरणाचे प्रतीक मानले जाते. हे वुम्मीदी बंगारू चेट्टी यांनी बांधले असल्याचे सांगितले जाते. चेट्टी हा तत्कालीन मद्रासचा प्रसिद्ध ज्वेलर होता. हा राजदंड सुमारे पाच फूट उंच असून वर नंदी बसलेला आहे.

सेंगोल हे प्रयागराज येथील संग्रहालयात ठेवण्यात आल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे. सेंगोलबाबत भाजप आणि काँग्रेस यामुळे आमनेसामने आले आहे.

सेंगोल यांच्याकडे सत्ता हस्तांतरणाबाबत पुरावे म्हणून कागदपत्रे नसल्याचा दावा काँग्रेसने केला. यावर भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले की, सेंगोलला काँग्रेसच्या दिशेने चालणारी काठी म्हणणे म्हणजे गांधी परिवाराचे लोकशाहीबद्दल काय मत आहे हे दिसून येते असा घणाघातही त्यांनी त्यांच्यावर केला होता.