नव्या वंदे भारत ट्रेनने बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड मोडला. 52 सेकंदात 100 किमी वेग, अहमदाबाद-मुंबई अंतर केवळ पाच तासात

वैष्णव यांनी सांगितले की या ट्रेनची तिसरी चाचणी झाली. या चाचणीत केवळ 52 सेकंदात या ट्रेनने 100 किमीचा वेग पकडला. याच्या तुलनेत ही गती पकडण्यासाठी बुलेट ट्रेनला 54.6 सेकंदाचा कालावधी लागतो.

नव्या वंदे भारत ट्रेनने बुलेट ट्रेनचा रेकॉर्ड मोडला. 52 सेकंदात 100  किमी वेग, अहमदाबाद-मुंबई अंतर केवळ पाच तासात
वंदे भारत ट्रेनचा नवा विक्रम
| Edited By: | Updated on: Sep 10, 2022 | 8:54 PM

नवी दिल्ली – देशातील पहिल्या सेमी हाय स्पीड आणि नव्या वंदे भारत ट्रेनने (Vande Bharat Train)चाचणीतच नवा रेकॉर्ड स्थापित केला आहे. या ट्रेनने केवळ 52 सेकंदात 100 किमी प्रति सात इतका वेग पकडला. यात बुलेट ट्रेनचा (Bullet train) रेकॉर्ड या नंदे भारत ट्रेनने तोडला आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव (Railway Minister)यांनी ही माहिती दिली आहे. ही देशातील तिसरी वंदे भारत ट्रेन आहे. ही ट्रेन अहमदाबाद-मुंबई या दरम्यान चालवली जाणार आहे.

वैष्णव यांनी सांगितले की या ट्रेनची तिसरी चाचणी झाली. या चाचणीत केवळ 52 सेकंदात या ट्रेनने 100 किमीचा वेग पकडला. याच्या तुलनेत ही गती पकडण्यासाठी बुलेट ट्रेनला 54.6 सेकंदाचा कालावधी लागतो. नव्या ट्रेनचा स्पीड हा 180 किलोमीटर प्रतितास इतका आहे. जुन्या वंदे भारत ट्रेनचा कमाल स्पीड हा 160 किमी प्रतितास इतका होता.

अहमदाबाद ते मुंबई पाच तासांत

नवी वंदे भारत ट्रेनची शुक्रवारी अहमदाबाद-मुंबई अशी चाचणी घेण्यात आली. ही ट्रेन अहमदाबादहून सूरतला केवळ 2 तास 32 मिनिटांत पोहचली. शताब्दी एक्सप्रेसला हेच अंतर कापण्यासाठी तान तासांचा कालावधी लागतो. अहमादाबादहून वंदे भारत ट्रेन 7.06 मिनिटांनी रवाना झाली. आणि सूरत स्टेशनला ती 9.38 वाजता पोहचली. तिथून कुठेही न थांबता मुंबई सेंट्रलला ती दुपारी 12.16 मिनिटांनी पोहचली. अहमदाबाद ते मुंबई हे 492 किमीचे अंतर कापण्यासाठी या ट्रेनला केवळ 5तास 10 मिनिटांचा कालावधी लागला. हेच अंतर शताब्दी एक्स्प्रेसला पार करण्यासाठी 6तास 20 मिनिटे लागतात.

वंदे भारत ट्रेनची वैशिष्ठ्ये

या नव्या ट्रेनमध्ये एयर प्युरिफायर सिस्टिम आहे. यामुळे 99 टक्के वायरस मारण्यात या व्यवस्थेला यश येते. वंदे भारत ट्रेनमध्ये विमानासारख्या सुविधा आहेत. एसी, टीव्ही, ऑटेमेटिक दरवाजे, हायक्लास पेंट्री, वॉशरुम हे सगळे या ट्रेनमध्ये आहे. ही गाडी पूर्णपणे मेड इन इंडिया आहे. याच्या गुणवत्तेचा दर्जा 3.2 इतका आहे. जागतिक पातळीवर हा दर्जा 2.9 इतका चांगला मानण्यात येतो. ऑक्टोबरपासून प्रत्येक महिन्यात वंदे भारत ट्रेनच्या नव्या बॅचेस सुरु होण्याची शक्यता आहे.