
31 डिसेंबर 2025 च्या रात्री संपूर्ण जग नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज होतं… सगळीकडे आनंदाचं वातवारण होतं… सर्वांनी नवीन वर्षाचं स्वागत देखील मोठ्या आनंदात केलं. पण एका तरुणासाठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आयुष्यातील शेवटचा दिवस ठरला. तरुणाच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर तरुणाची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आहे… त्या रात्री असं काय झालं ज्यामुळे तरुणाचं निधन झालं आसा प्रश्न तुम्हाला देखील नक्कीच पडला असेल. नवीन वर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांसोबत काय घडलं ते जाणून घ्या…
नवीन वर्षांचं स्वागत करण्यासाठी गेलेल्या तीन मित्रांच्या आयुष्यातील रात्र सर्वात भयानक ठरली. तर त्यापैकी एकाची तर शेवटची ठरली… आंध्र प्रदेशातील डॉ. बी.आर. आंबेडकर कोनसीमा जिल्ह्यातील अंतरवेदी समुद्रकिनारी पोहोचलेल्या तीन मित्रांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. थारमध्ये फिरत असताना डाईव्ह करणाऱ्या एका मित्राचं गाडीवरीन नियंत्रण सुटलं आणि कार पाण्यात बुडाली..
या अपघातात एक मित्राचं निधन झालं असून, दुसरा अद्याप बेपत्ता आहे, तर तिसऱ्याचे प्राण बचावले आहे… निम्मकायला काकीनाडाहून आलेले श्रीधर, साईनाथ आणि गोपीकृष्ण यांनी एका रेस्टोरेंट खोली बूक केली होती आणि तिने आनंदात न्यू ईयर सेलिब्रेट करत होते.. त्यानंतर, ते तिघेही थारमध्ये फिरायला गेले, परंतु अण्णा-चेल्ला गट्टूजवळील तीक्ष्ण वळण त्यांना वेळेत दिसले नाही. तोल गेल्याने गाडी थेट समुद्रात कोसळली.
गाडी पाण्यात बुडतीये कळल्यानंतर एक मित्र गोपीकृष्ण यांना कारमधून उडी मारली. तर श्रीधर कारसोबत नदीत वाहून गेला… त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर बचाव कार्य सुरु झालं. पोलिसांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे…
संबंधित प्रकरणाची पोलीस सर्वच बाजूंनी तपास करत आहेत. प्राथमिक तपासात असं दिसून आलं आहे की, वेग आणि समुद्रकिनाऱ्याजवळील धोकादायक वळण हे अपघाताचं संभाव्य कारण असू शकते. अधिकाऱ्यांनी पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांवर गाडी चालवणं टाळण्याचं आणि सुरक्षिततेच्या नियमांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे.