आरोग्य सुविधांमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप, देशात तिसरा क्रमांक

गेल्या वर्षीच्या अहवालात सहाव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने यावेळी तिसरा क्रमांक मिळवलाय. केरळ पहिल्या, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आरोग्य सुविधांमध्ये महाराष्ट्राची मोठी झेप, देशात तिसरा क्रमांक

नवी दिल्ली : आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबाबत निती आयोगाने जारी केलेल्या health index मध्ये महाराष्ट्राने मोठी झेप घेतली आहे. गेल्या वर्षीच्या अहवालात सहाव्या क्रमांकावर असलेल्या महाराष्ट्राने यावेळी तिसरा क्रमांक मिळवलाय. केरळ पहिल्या, आंध्र प्रदेश दुसऱ्या आणि महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे. विविध निकष लक्षात घेऊन आरोग्य मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने ही रँकिंग जारी करण्यात येते.

नीती आयोगाने जारी केलेली रँकिंग 2017-18 या वर्षातील आहे. महाराष्ट्राने 2015-16 च्या रँकिंगमध्ये सहावा क्रमांक मिळवला होता. यावेळच्या रँकिंगमध्ये उत्तर प्रदेशची कामगिरी सर्वात खराब आहे. नीती आयोगाकडून 23 निकषांचा अभ्यास करण्यात आला आणि हे निकष पूर्ण करणाऱ्या राज्यांना त्यानुसार गुण देण्यात आले.

वाढीव कामगिरीमध्ये हरियाणा, राजस्थान आणि झारखंड यांचा क्रमांक आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये पहिल्या टप्प्यातील अहवाल जारी करण्यात आला होता, ज्यासाठी 2014-15 हे मूळ वर्ष ग्राह्य धरण्यात आलं होतं. कोणत्या राज्यांमध्ये कशा पद्धतीने सुविधा दिल्या जातात, त्यावर किती खर्च केला जातोय, सुविधा पोहोचवण्याचं प्रमाण कसं आहे असे विविध निकष या अहवालात लक्षात घेतले जातात.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *