मोठी बातमी! नितीश कुमार यांचा मोठा निर्णय, भाजपला हादरा, थेट या नव्या पक्षासोबत युती
बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. राज्यात जेडीयू आणि भाजपची सत्ता आली, मात्र त्यानंतर आता नितीश कुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हा भाजपसाठी धक्का मानला जात आहे.

बिहार विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएला मोठं यश मिळालं होतं. काँग्रेसला मोठा धक्का बसला. दरम्यान राज्यात एनडीएची सत्ता येताच नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि 15 एप्रिल 2026 रोजी भाजप नेते सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. बिहारमध्ये सुरू असलेल्या या सर्व घडामोडींमुळे जेडीयूमध्ये नाराजीचा सूर असल्याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रांगली. त्यानंतर बिहारमध्ये समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या मुद्द्यावर देखील नितीश कुमार यांचा पक्ष असलेला जेडीयू भाजपसोबत दिसून आला नाही. आता नितीश कुमार यांनी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
पंजाबमध्ये पुढच्या वर्षी 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. या विधानसभा निवडणुकीची तयारी जेडीयूने आतापासूनच सुरू केली असून, पंजाबमध्ये जेडीयूने भाजपसोबत युती न करता थेट शिरोमणी अकाली दल श्री आनंदपूर साहिब (एसएडीएसएएस) सोबत युती केली आहे. जेडीयू हा एनडीएचा प्रमुख घटक पक्ष आहे. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयूचं सरकार आहे. परंतु दुसरीकडे आता पंजाबमध्ये मात्र जेडीयून मोठा निर्णय घेतला आहे. जेडीयूनं शिरोमणी अकाली दलासोबत युती केली आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नितीश कुमार याचा हा आपला मित्र पक्ष असलेल्या भाजपसाठी पहिला धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नितीश कुमार यांची पुढची वाटचाल कशी असणार? हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तर दुसरीकडे सुनील दत्त यांची पुतणी आणि संजय दत्त यांची चुलत बहीण ममता दत्त यांनी देखील जेडीयूमध्ये प्रवेश केला आहे. एसएडीएसएएस आणि जेडीयूची युती झाली असून, पंजाब विधानसभेच्या सर्व जागांवर ते आपले उमेदवार उभे करणार आहेत. समविचारी पक्षांना एका मंचावर आणण्यासाठी आम्ही युती केली असल्याची माहिती यावेळी जेडीयूचे पंजाबचे प्रदेशाध्यक्ष मलविंदर सिंह बेनीपाल यांनी दिली आहे. त्यामुळे आता पंजाबमध्ये भाजपसमोर, आप, काँग्रेससह आता जेडीयूचं देखील मोठं आव्हान असणार आहे.