
Video Viral : सोशल मीडियावर सध्या बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्यांनी सर्वांसमोर एका डॉक्टर मुस्लीम महिलेचा बुरखा ओढला आहे. ज्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. 15 डिसेंबर रोजी, जेव्हा मुख्यमंत्री नितीश कुमार आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्रे देत होते, तेव्हा त्यांनी त्यापैकी एका नुसरत नावाच्या महिला डॉक्टरचा बुरखा ओढला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लाजिरवाण्या वागणुकीवर विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. काँग्रेसपासून शिवसेना (UBT) नेत्यांनी नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी संताप व्यक्त करत म्हणाले, नितीश कुमार आणि भाजपला लाज वटली पाहिजे… कोणता व्यक्ती मानसिक रित्या स्थिर असले तर, त्याला कोणत्याच महिलेचा पदर आणि बुरखा ओढण्याचा अधिकार नाही… काँग्रेस प्रवक्ते उदित राज म्हणाले, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या अस्थिर आहेत आणि त्यांनी अनेक वेळा असं वर्तन केलं आहे. एनडीए नेते असेच आहेत.
शर्मनाक!
एक महिला डॉक्टर का हिजाब खींचना उसकी गरिमा और धार्मिक पहचान पर सीधा हमला है।
जब राज्य का मुख्यमंत्री ऐसा करे, तो महिलाओं की सुरक्षा पर सवाल उठना लाज़मी है। pic.twitter.com/NY7lfsCIn6
— Iqra Hasan (@IqraMunawwar_) December 15, 2025
RJD खासदार प्रकरणावर संताप व्यक्त करत म्हणाले, ‘मी व्हिडीओ पाहिले आहेत… मन सुन्न करणारे त्यामधील दृश्य आहेत… उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांना थांबवण्याचा देखील प्रयत्न केला. हा एक चिंतेचा विषय आहे… व्हिडीओ समाजाला चांगला संदेश देत नाहीये, चिंता निर्माण करत आहे…’
शिवसेना (यूबीटी) खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, “हे पूर्णपणे लज्जास्पद आहे. हे निव्वळ छळ आहे आणि त्यांनी माफीमागितली पाहिजे. मुख्यमंत्र्यांना कोणाचाही बुरखा ओढण्याचा अधिकार नाही.”
समाजवादी पक्षाचे खासदार अवधेश प्रसाद यांनी देखील संताप व्यक्त केला आहे, नितीश कुमार मानसिकदृष्ट्या कमकुवत झाले आहेत. त्यांना वैद्यकीय उपचारांची गरज आहे…’, तर अवेधश प्रसाद म्हणाले, ‘हे बिहारचं दुर्भाग्य आहे… नितीश कुमार यांनी यापूर्वी देखील असं कृत्य अनेकदा केलं आहे…’, व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे राजकारणातील वातावरण देखील चांगलंच तापलं आहे.