घरात कुठेही साप लपू द्या, क्षणात घर सोडून दूर निघून जाईल, सर्पमित्रांनी सांगितली सोपी ट्रिक

पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतुंमध्ये प्रामुख्याने साप बिळात कमी आणि जमिनीवर जास्त असतात. कारण उन्हाळ्यामध्ये त्यांना जमिनीचं तापमान सहन होत नाही, तसेच पावसाळ्यात बिळात पाणी शिरतं, त्यामुळे अशावेळी साप हे नेहमी सुरक्षित निवाऱ्याच्या शोधात असतात, ते तुमच्या घरात देखील घुसू शकतात.

घरात कुठेही साप लपू द्या, क्षणात घर सोडून दूर निघून जाईल, सर्पमित्रांनी सांगितली सोपी ट्रिक
snake
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 13, 2026 | 9:08 PM

पावसाळा आणि उन्हाळ्यामध्ये सांपांचा धोका अधिक वाढतो, त्या तुलनेत हिवाळ्यात सापांचा धोका कमी असतो. कारण हिवाळ्यात साप हे थंडीमुळे बिळात दडून बसतात. परंतु उन्हाळ्यात अन् पावसाळ्यात साप हे बिळात कमी अन् जमिनीवर जास्त असतात, त्याचं मुख्य कारण म्हणजे उन्हाळ्यामध्ये जमिनीचं तापमान वाढंत, त्यामुळे सापांना बिळात उष्णतेचा त्रास होतो. साप हा मुळातच थंड रक्ताचा प्राणी असल्यामुळे त्याला उष्णता सहन होत नाही. तर पावसाळ्यामध्ये बिळात पाणी घुसतं, किंवा अनेकदा जोरदार पाऊस झाला तर पावसाच्या पाण्याबरोबर वाहून आलेल्या मातीमुळे सापांची बीळं देखील बुजतात. अशावेळी मग साप काय करतात, तर निवाऱ्यासाठी सुरक्षित जागा शोधतात. जिथे जास्त आर्द्रता असेल, अंधार असेल आणि लपण्यासाठी सुरक्षित जागा असेल अशा जागी साप आश्रय घेतात. त्यांना जर तुमच्या घरात असं वातावरण मिळालं, तर ते तुमच्या घरात देखील लपू शकतात. यासाठी सर्पमित्रांनी काही खास ट्रिक सांगितल्या आहेत, यामुळे जरी समजा तुमच्या घरात साप लपलेला असेल तर तो तुमचं घर सोडून दूर निघून जाईल.

सापांना मसाल्यांचा वास सहन होत नाही, जसं की ज्या मसाल्यांना तीव्र वास आहे, ज्यामध्ये कांदा, लसून असे पदार्थ अशा पदार्थांपासून साप कायम दूर राहतो. त्याचा त्याला त्रास होतो. त्यामुळे तुम्हाला जिथे साप लपून बसण्याची शक्यता वाटत आहे, किंवा जिथून तुमच्या घरात साप प्रवेश करू शकतो, असं वाटत असेल तर तिथे तुम्ही कांद्याचे छोटे-छोटे काप वाळून टाकू शकतात. तसेच लसणाच्या पाकळ्या देखील टाकू शकतात, या मसाल्यांच्या वासांमुळे साप नेहमी तुमच्या घरापासून दूर राहतील.

Loading...

समजा तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याला चुकूनही पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका, कारण तो साप विषारी आहे की बिनविषारी याबद्दल आपल्याला कोणतीही कल्पना नसते, त्यामुळे जर तुम्हाला कुठेही साप दिसला तर त्याची माहिती सर्पमित्रांना द्यावी, ते सापांना सुरक्षितपणे रेस्क्यू करतील.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us