… तर नाही मिळणार पेट्रोल आणि डिझेल, PUC विषयी मोठा निर्णय, कुठे कुठे अंमलबजावणी?

PUC for Petrol Diesel : प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, PUC वरून काही ठिकाणी प्रशासनाने तडक कारवाईचे निर्देश दिल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे वाहनधारकांची धांदल उडाली आहे. काय आहे तो निर्णय?

... तर नाही मिळणार पेट्रोल आणि डिझेल, PUC विषयी मोठा निर्णय, कुठे कुठे अंमलबजावणी?
पीयूसी पेट्रोल डिझेल
| Updated on: Sep 23, 2026 | 8:15 AM

प्रदूषणावर नियंत्रणासाठी आणि प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कठोर निर्णय घेतला आहे. देशातील अनेक ठिकाणी प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र, PUC वरून प्रशासनाने तडक कारवाईचे निर्देश दिले आहे. प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र PUC नसेल तर अशा वाहनधारकांना 1 ऑक्टोबरपासून कोणत्याही पेट्रोल पंपावर इंधन न देण्याचे निर्देश काही जिल्ह्यात दिल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील शामलीत प्रशासन अंमलबजाणीसाठी सरसावले आहे.

एएनपीआर कॅमेऱ्यांची कडक नजर

सर्व पेट्रोल पंपांवर ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्शिन (ANPR) कॅमेरे बसवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. हे कॅमेरे पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट तात्काळ स्कॅन करतील. संबंधीत वाहनांची पीयूसी वैध आहे की नाही, याची माहिती सिस्टिमला देतील. पीयूसी एक्स्पायर झालेले आढळल्यास पंपावरील मशिनमधून इंधन पुरवठा आपोआप रोखला जाईल. देशातील काही ठिकाणी 30 सप्टेंबरपर्यंत हे कॅमेरे बसवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशातील अनेक भागात अद्याप एएनपीआर नंबर प्लेट आणि त्याला स्कॅन करणारे कॅमेरे लावण्यात आलेले नाहीत. प्रयोगी तत्वावर अनेक ठिकाणी प्रशानसाने त्याची सक्ती केली आहे.

तर पेट्रोल पंपाचा परवानाही रद्द

शामली प्रशासनाने तर एक पाऊल पुढे टाकले आहे. आदेशाचे पालन न केल्यास पेट्रोल पंपाचे लायसन्स रद्द करण्यात येणार आहे. 1 ऑक्टोबरपासून एएनपीआर कॅमेरे न बसवणाऱ्या पेट्रोल पंपावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात येणार आहे. विहित मुदतीत कॅमेरे न बसवल्यास पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. तर ज्या वाहनधारकांकडे पीयूसी नाही त्यांनाही मोठा फटका बसणार आहे. देशातील अनेक ठिकाणी प्रशासन अशीच कारवाई करण्याच्या तयारीत आहे. वाढती गुन्हेगारी, अपघातात पळून जाणाऱ्या वाहनधारकांना पकडण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी हे नियम बंधनकारक करण्यात येणार आहे.

विना पीयूसी वाहन चालवणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा धडाका सुरू करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पेट्रोल पंप चालकांनाही कॅमेरे बसवण्याची आग्रही मागणी करण्यात येत आहे. यामुळे ज्या वाहनधारकांकडे पीयूसी नसेल त्यांना पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही. एका प्रणालीद्वारे त्यांचा वाहन क्रमांक स्कॅन होईल. त्यावरून पीयूसी आहे की नाही याचा पडताळा होईल. पीयूसी नसेल तर पेट्रोल आणि डिझेल मिळणार नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us