AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NO PUC, NO Fuel; पेट्रोल-डिझेल सोडा CNG पण नाही मिळणार, त्या निर्णयाने नागरिकांना मोठी धडकी

NO PUC, NO Fuel: आखाती युद्धामुळे देशात इंधन आणि गॅस तुटवड्याची भीती वाढली होती. काही दिवस पुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला होता. तर आता अजून हे टांगती तलवार नागरिकांवर आली आहे. काय आहे ती मोठी बातमी?

NO PUC, NO Fuel; पेट्रोल-डिझेल सोडा CNG पण नाही मिळणार, त्या निर्णयाने नागरिकांना मोठी धडकी
पीयूसी नाही, पेट्रोल डिझेल नाहीच, सीएनजी ही नाहीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 23, 2026 | 11:02 AM
Share

NO PUC, NO Petrol-Diesel-CNG: वाहनाचे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) नसेल तर पेट्रोल, डिझेलच नाही तर सीएनजी मिळण्यासही अडचण होणार आहे. आखाती संघर्षामुळे गॅससह इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला. देशभरात काही दिवस इंधनासाठी लांबच लांब रांगा लागल्या. आता पुरवठा सुरळीत झालेला असताना जर तुमच्याकडे पीयूसी नसेल तर पेट्रोल-डिझेल मिळणार नसल्याचे आदेश येऊन धडकले आहेत. अर्थात हा प्रयोग देशाची राजधानी दिल्लीत सुरू करण्यात आला आहे. पण अनेक राज्य सुद्धा असा निर्णय घेऊ शकतात. वाढते तापणान आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी असा निर्णय इतर राज्यातही लागू होऊ शकतो.

पीयूसी नाही तर पेट्रोल-डिझेलसह सीएनजी नाही

राजधानी दिल्लीतील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी कडक आदेश दिले आहे. बुधवारी रेखा गुप्ता यांनी पीयूसी नाही तर इंधन नाही या धोरणाची सक्तीने अंमलबजावणीचे आदेश अधिकाऱ्यांना आणि पेट्रोल पंप चालकांना दिले आहेत. हा नियम सक्तीने लागू करण्यात येत आहे. अर्थात त्याची सुरुवात गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये सुरू करण्यात आली होती. वाहनासाठी वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राची मागणी करण्यात येत होती. नागरिकांनी आणि ऑटो चालकांनी अपेक्षित प्रतिसाद न दिल्याने आता हा निर्णय सक्तीने लागू करण्यात येत आहे. वाहनधारकांना त्यांचा वाहनाचे पीयूसी दाखवावे लागले. तरच त्यांना पेट्रोल, डिझेल अथवा सीएनजी मिळणार आहे. वायू प्रदूषण कमी करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

नाहीतर थेट कारवाई

दिल्लीतील प्रदूषण कमी करावे आणि हवा स्वच्छ राहावी यासाठी दिल्ली सरकारने कडक पावलं टाकली आहेत. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे पाऊल टाकण्यात आले आहे. पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी चालकांना आता वाहनधारकांना पीयूसी व्यतिरिक्त इंधन वा गॅस देता येणार नाही. जे इंधन पंप चालक या नियमाचे सक्तीने पालन करणार नाहीत, त्यांच्याविरोधातही कडक कारवाई करण्यात येणार आहे.

विना PUC अनेक वाहन रस्त्यावर

मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या नुसार, दिल्लीत मोठ्या प्रमाणावर विना पीयूसी वाहनं ही रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे शहरातील हवेची गुणवत्ता ही खालावली आहे. हिवाळ्यात आणि या वर्षाच्या सुरुवातीला दिल्लीतील दृश्यमानता अत्यंत कमी होती. तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन भारत दौऱ्यावर असतानाही दिल्लीतील खराब हवेची मोठी चर्चा झाली होती. त्यानंतर आता दिल्ली सरकारने वाहनधारकांसाठी पीयूसी सक्तीचे केले आहे. हाच निर्णय इतर राज्यातही लागू व्हावा अशी मागणी होत आहे.

Follow Us
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे