मुलींनी व्हॅलेंटाईन डेच्या आधी बॉयफ्रेंड बनवणं बंधनकारक, महाविद्यालयाच्या नोटीसवरुन गदारोळ

| Updated on: Jan 27, 2021 | 3:47 PM

व्हॅलेंटाईन डे तरुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. या दिवशी जगभरातील तरुणाई आणाभाका घेत स्वप्नातील जोडीदारासोबत आनंद व्यक्त करण्याचं मनोमन ठरवतात.

मुलींनी व्हॅलेंटाईन डेच्या आधी बॉयफ्रेंड बनवणं बंधनकारक, महाविद्यालयाच्या नोटीसवरुन गदारोळ
Follow us on

लखनौ : व्हॅलेंटाईन डे तरुणाच्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस. या दिवशी जगभरातील तरुणाई अनेक आणाभाका घेत स्वप्नातील जोडीदारासोबत आनंद साजरा करण्याचं मनोमन ठरवतात. मात्र, हा दिवस महाविद्यालयांसाठी अनेकदा आव्हान घेऊन येतो. उत्तर प्रदेशमध्ये आग्रा येथील सेंट जॉन महाविद्यालयातही असाच काहीसा प्रकार घडला. सध्या या कॉलेजच्या व्यवस्थापनाच्या नावे एक नोटीस फिरत आहे. यात महाविद्यालयातील सर्व मुलींना व्हॅलेंटाईन डेच्या आधी बॉयफ्रेंड बनवणं बंधनकारक असल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थींनींमध्ये गोंधळाचं वातावरण आहे. असं असलं तरी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी महाविद्यालय प्रशासनाकडून अशी कोणतीही नोटीस जारी केली नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय (Notice of a college asks girls to get a boyfriend before valentines day in Agra).
.

सेंट जॉन कॉलेजच्या लेटर हेडवर जारी करण्यात आलेली ही नोटीस सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या लेटर हेडवर कॉलेड डीन म्हणून प्राध्यापक आशिष शर्मा यांचं नाव आहे. 14 जानेवारी रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये म्हटलं आहे, “महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींनी 14 फेब्रुवारीच्या आधी व्हॅलेंटाईन दिनानिमित्त किमान एक बॉयफ्रेंड बनवणं बंधनकारक आहे. हे मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ठरवण्यात आलंय. एकट्या मुलींना महाविद्यालय परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. महाविद्यालयात येताना मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडसोबतचा अगदी अलीकडचा फोटो दाखवावा लागेल. प्रेम पसरवा.”

सेंट जॉन कॉलेज आग्रामधील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी आहे. याची स्थापना 1850 मध्ये ब्रिटिशांनी केली होती. महाविद्यालयाच्या नावाने शेअर होत असलेल्या या नोटीसने महाविद्यालयातील विद्यार्थींनींमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण केलाय. अनेक मुलींनी तर थेट घरच्यांकडे धाव घेतलीय. यानंतर पालकांनी याबाबत जाब विचारला असता महाविद्यालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. सेंट जॉन महाविद्यालयाचे प्राचार्य एस. पी. सिंग म्हणाले, “महाविद्यालय प्रशासनाकडून अशी कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली नाही.. काही समाजविघातक घटकांनी महाविद्यालयाची चांगलं नाव आणि प्रतिष्ठा खराब करण्यासाठी अशा प्रकारची खोटी नोटीस तयार करुन सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. हे कुणी केलं आहे याचा आम्ही तपास करत आहोत.”

“महाविद्यालयातील विद्यार्थ्यीनींनी या अनधिकृत खोट्या नोटीसवर विश्वास ठेऊ नये. महाविद्यालय प्रशासन हे कृत्य करणाऱ्यांचा शोध लावले आणि कारवाई करेल. संबंधित नोटीसवर नाव असलेली आशिष शर्मा नावाची कोणतीही व्यक्ती कॉलेज कर्मचाऱ्यांमध्ये नाहीये,” असंही प्राचार्यांनी नमूद केलं.

हेही वाचा :

रोहित पवारांकडून व्हॅलेंटाईन डेच्या खास शुभेच्छा, म्हणाले तरुणांनो लक्षात असू द्या…

Delhi Election Results 2020: ‘व्हॅलेंटाईन डे’ आणि अरविंद केजरीवालांचं अनोखं कनेक्शन!

व्हिडीओ पाहा :