AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट

मोठी बातमी समोर येत आहे, इयत्ता पाचवीच्या पुस्तकामध्ये चक्क ऐश्वर्या रायचं एक प्रसिद्ध गाणं छापण्यात आलं आहे. यामुळे मोठा गोंधळ होण्याची शक्यता आहे. पालकांकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.

आता इयत्ता पाचवीच्या पुस्तकात थेट ऐश्वर्या रायचं ते जगप्रसिद्ध गाणं, 1999 साली आला होता चित्रपट
Aishwarya RaiImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 29, 2026 | 4:15 PM
Share

अनेकदा अभ्यासक्रमात छापण्यात आलेला धडा किंवा कविता चर्चेचा विषय बनते, त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. कधीकधी एखादा विशिष्ट धडा किंवा कविता पाठ्यपुस्तकांमध्ये छापण्यास प्रचंड विरोध देखील होतो, तर कधी एखादी कविता किंवा धडा अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने देखील विरोध होतो, अभ्यासक्रम मंडळावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं. तर कधी कधी पुस्तक छापतानाच एवढ्या गंभीर चुका होतात की, त्याची संपूर्ण राज्यभरात चर्चा होते. आसाच एक धक्कादायक प्रकार ओडिशामधून समोर आला आहे. ओडिशामध्ये 5 वी वर्गाच्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकामध्ये चक्क अभिनेत्री ऐश्वर्या रायचं प्रसिद्ध गाणं ‘निंबूडा-निंबूडा छापण्यात आलं आहे. या गाण्यामुळे आता मोठा गोंधळ उडाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार ओडिशामध्ये इयत्ता पाचवीच्या अभ्यासक्रमात चुकीने 1999 साली प्रसिद्ध झालेला ऐश्वर्या रायचा चित्रपट ‘हम दिल दे चुके सनम’ मध्ये असलेलं गाणं ‘निंबूडा-निंबूडा छापण्यात आलं आहे. शाळेमध्ये नवे पुस्तक दाखल होताच हा गोंधळ समोर आला आहे, त्यामुळे आता संपादकीय आणि क्वालिटी विभागाच्या या गंभीर चुकीवर संताप व्यक्त केला जात आहे. ओडिशा टीव्हीच्या एका रिपोर्टनुसार जेव्हा पाचवी इयत्तेची पुस्तकं ऑनलाईन पब्लिश करण्यात आली, तेव्हा ही चूक समोर आली आहे. पाचवीच्या पुस्तकामध्ये ऐश्वर्या रायचं गाणं छापण्यात आलं आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर आल्यानंतर आता पालकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत असल्याचं पहायला मिळत आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. एवढी मोठी चूक मुलांपर्यंत पोहोचली कशी? असा सवाल पालकांमधून उपस्थित होत आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अतंर्गत राज्यात जारी करण्यात आलेल्या नव्या पुस्तकांमध्ये तब्बल 1600 हून अधिक चुका असल्याचं समोर आलं आहे. नव्या धोरणांतर्गत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी छापण्यात आलेल्या 55 नव्या पुस्तकांमध्ये तब्बल 1,678 चुका आढळून आल्या आहेत. या प्रकरणात ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी काही अधिकाऱ्यांना निलंबीत देखील केलं आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांकडून घेण्यात आली आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा