AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET फेर परीक्षेआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, Telegram वर बंदी

NEET-UG 2026 फेर परीक्षेआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. नीट ही देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटू नयेत यासाठी पेपर पोहोचवण्याची जबाबदारी वायू दलावर सोपवण्यात आली आहे. 

NEET फेर परीक्षेआधी सरकारने घेतला मोठा निर्णय, Telegram वर बंदी
neet re exam
| Updated on: Jun 16, 2026 | 11:04 AM
Share

NEET-UG 2026 फेर परीक्षेआधी सरकारने मोठं पाऊल उचललं आहे. Telegram बंदी घातली आहे. NEET-UG 2026 फेर परीक्षा 21 जून रोजी होणार आहे. टेलीग्रामवर 22 जून पर्यंत बंदी असेल. मेसेज एडिट फीचर 30 जून पर्यंत बंद राहील. NEET-UG 2026 फेर परीक्षा सुरक्षित आणि निष्पक्षतेने व्हावी म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे. NTA नुसार, काही टोळ्या टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबांना प्रश्नपत्रिका उपलब्ध करुन देतो, असं सांगून फसवणूक करत होत्या. “Paper Leaked NEET”, “Re-NEET 2026” आणि “Private Mafia” सारख्या चॅनल्सवरुन हजारो ते लाखो रुपयांची मागणी केली जात होती. परीक्षेची प्रश्नपत्रिका पूर्णपणे सुरक्षित असून ती कोणाकडेही नाही, असं एजन्सीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

अनेक बाबतीत टेलिग्रामच्या मेसेज एडिट फिचरचा चुकीच्या पद्धतीने वापर करण्यात आला असं NTA कडून सांगण्यात आलं. परीक्षा झाल्यानंतर जुन्या मेसेजमध्ये खरी प्रश्नपत्रिका जोडून प्रश्नपत्रिका लीक झालीय असं दाखवण्यात येत होतं. असे खोटे प्रकार रोखण्यासाठी टेलिग्राम बंदीचं पाऊल उचलण्यात आलं आहे.

त्रासाबद्दल आम्हाला खंत आहे

आम्हाला माहितीय Telegram चा वापर लाखो लोक शिक्षण, नोकरी आणि व्यक्तिगत कामांसाठी करतात. त्यामुळे त्यांना होणाऱ्या त्रासाबद्दल आम्हाला खंत आहे असं NTA ने म्हटलं आहे. टेलिग्रामवरील बंदी ठराविक काळासाठी आहे. 21 जूनला होणारी NEET-UG 2026 सुरक्षित पार पाडावी यासाठी ही बंदी घातली आहे.

किती लाख मुलं परीक्षेला बसणार?

एजन्सीने विद्यार्थी आणि पालकांना आवाहन केलय की, कुठलीही अफवा आणि चुकीच्या माहितीवर विश्वास ठेऊ नका. परीक्षेशी संबंधित कुठलीही माहिती अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in आणि NTA सोशल मिडिया अकाऊंटसवरुन घ्या. पेपर फुटल्यामुळे 3 मे रोजी NEET UG परीक्षा रद्द झाली. आता 21 जूनला फेर परीक्षा होणार आहे. 22 लाख विद्यार्थी नीटची फेर परीक्षा देणार आहेत. नीट ही देशातील लाखो विद्यार्थ्यांसाठी महत्वाची परीक्षा आहे. नीट परीक्षेचे पेपर फुटू नयेत यासाठी पेपर पोहोचवण्याची जबाबदारी वायू दलावर सोपवण्यात आली आहे.

Follow Us
तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान
Sanjay Raut | 'तर मी पंतप्रधानांना भेटेन, राष्ट्रहितासाठी... संजय राऊतांचं हे विधान इतकं चर्चात का? राजकारणात मोठी खळबळ
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक?
Mumbai Water Shortage | मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा! तलावात फक्त 10% पाणी शिल्लक पुढच्या आठवड्यापासून मोठी पाणीकपात?
7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार..
मोठी बातमी! 7 खासदार फुटणार? चर्चांना उधाण; उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, ते खासदार....
महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ
Fuel Price Hike | महागाईचा तडाखा सुरूच! CNG-PNG दरात तिसऱ्यांदा मोठी वाढ, सर्वसामान्य हैराण!
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...