NTA NEET: लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ… 1, 2, 5 नाही तर इतक्यावेळा परीक्षा रद्द … NTA वर देश चवताळला

NEET UG 2026 परीक्षा रद्द झाल्याने देश भडकला आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या भ्रष्ट व्यवस्थेविरोधात संताप व्यक्त केला आहे. दिल्लीसह अनेक शहरात आंदोलन भडकले आहे. गेस पेपर व्हायरल झाल्याच्या आरोपानंतर सीबीआयने सूत्र हाती घेतली आहे. कितीदा रद्द झाली आहे NTA कडून घेतलेल्या गेलेल्या परीक्षा?

NTA NEET: लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ... 1, 2, 5 नाही तर इतक्यावेळा परीक्षा रद्द ... NTA वर देश चवताळला
नीट युजी २०२६
Image Credit source: एजन्सी
| Updated on: May 12, 2026 | 1:28 PM

NEET UG 2026 परीक्षा रद्द झाल्याने देशात संतापाची लाट उसळली. मेहनती, कष्टाळू आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे श्रम, पैसा आणि वेळ सर्व वाया गेले आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर विद्यार्थी, पालकांचा मोठा रोष आहे. कारण ही एजन्सी अस्तित्वात आल्यापासूनच तिच्यावर कारभारावर सातत्याने नाराजी सुरू आहे. परीक्षेपूर्वीच गेस पेपर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला. तेव्हापासून तपास यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. त्यांनी तपास सुरू केला होता. एका दाव्यानुसार, गेस पेपरमधील जवळपास 125 प्रश्न हे 3 मे रोजी आयोजित परीक्षेत आले आहेत. तर आतापर्यंत NTA कडून घेतलेल्या गेलेल्या परीक्षा कितीदा रद्द करण्यात आली वा पुढे ढकलली याची आकडेवारी धक्कादायक आहे.

16 परीक्षा करण्यात आल्या रद्द

नॅशनल टेस्टिंग एजन्सीची (NTA) स्थापना मोदी सरकारच्या काळात 2018 मध्ये करण्यात आली. तेव्हापासून या आठ वर्षात 16 वेळा परीक्षा रद्द करण्याची नामुष्की या एजन्सीवर आली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयानेच ही आकडेवारी वर्ष 2024 मध्ये लोकसभेत दिली होती. तत्कालीन शिक्षण राज्यमंत्री सुकांत मुझुमदार यांनी लेखी उत्तर दिले होते. डीएमकेच्या खासदार कनिमोझी करुणानिधी यांनी याविषयीचा सवाल उपस्थित केला होता. उत्तरात NTA ने दोन वर्षांपूर्वी 240 हून अधिक परीक्षांचे यशस्वी आयोजन केले असून त्यात 5.4 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतल्याचा दावा करण्यात आला होता.

मंत्रीमहोदयांनी सांगितले की, NTA कडून आयोजीत अनेक परीक्षांमधील विषय, अनेक शिफ्ट आणि अनेक दिवस चालतात. कोविड महामारी, तांत्रिक बिघाड, प्रशासकीय कारणं, कायदेशीर आदेश आणि लॉजिस्टिकचा परिणाम यासह इतर कारणांमुळे या परीक्षा नियोजित वेळेत आयोजित करता आल्या नाहीत. त्या पुढे सुद्धा ढकलाव्या लागल्या आहे.

या परीक्षा रद्द करण्याची NTA वर नामुष्की

JEE Main 2020, NEET-UG 2020, JEE Main 2021 आणि NEET-UG 2021 सारख्या परीक्षा कोविड महामारी काळात रद्द कराव्या लागल्या आहेत.

CSIR UGC-NET 2020, UGC-NET डिसेंबर 2020, UGC-NET मे 2021 आणि ICAR AIEEA 2020 परीक्षा कोविड आणि लॉजिस्टिक आव्हानांमुळे टळल्या.

DUET 2020 परीक्षा ही दिल्ली विद्यापीठातील नोंदणी प्रक्रियेतील अडचणीमुळे स्थगित करावी लागली.

CMAT 2021 परीक्षा AICTE कडून परीक्षेच्या पॅटर्नमधील बदलांमुळे टळली.

All India Ayush Post Graduate Entrance Test (AIAPGET) 2021 आणि Joint Integrated Programme in Management Admission Test (JIPMAT) 2021 कोविडमुळे स्थगित करावी लागली

2022 मध्ये IGNOU PhD Entrance परीक्षा प्रशासकीय कारणांमुळे टळली.

2023 मध्ये Graduate Aptitude Test Biotechnology (GAT-B) परीक्षा ही बायोटेक्नोलॉजी केंद्राच्या सल्ल्यानंतर स्थगित करण्यात आली.

तर 2024 मध्ये National Common Entrance Test (NCET) परीक्षा तांत्रिक कारणांमुळे आणि CSIR-NET परीक्षा लॉजिस्टिक कारणांमुळे टळली.

Follow Us