अखेर ज्याची भीती होती ते झालंच, परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण

| Updated on: Dec 26, 2022 | 5:15 PM

चीनमध्ये ओमायक्रोनच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाने धुमाकूळ माजलेला असताना भारतासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.

अखेर ज्याची भीती होती ते झालंच, परदेशातून आलेल्या चौघांना Corona च्या नव्या व्हेरियंटची लागण
प्रातिनिधिक फोटो
Image Credit source: social media
Follow us on

पाटणा : चीनमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या प्रादूर्भावाने धुमाकूळ माजलेला असताना भारतासाठी चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे. परदेशातून बिहारमध्ये आलेल्या चार प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. याापैकी तीन जण हे म्यानमारचे रहिवासी तर एकजण बँकाँक येथे राहणारा आहे. चौघांनाही आयसोलेशनमध्ये ठेवल्याची माहिती बिहार प्रशासनाकडून अधिकृतपणे देण्यात आलीय.

विशेष म्हणजे याआधी उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे चीनमधून आलेल्या एका प्रवाशाला कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे आग्र्यातील आरोग्य विभागात खळबळ उडाली होती. संबंधित रुग्णावर सध्या उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे.

हे सुद्धा वाचा

दुसरीकडे बिहारच्या गया विमानतळावर आलेल्या चार जणांच्या आरटीपीसीआर टेस्टमध्ये इंग्लंड आणि म्यानमार येथून आलेल्या चौघांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आलीय. त्यानंतर गया येथील आरोग्य विभाग अलर्ट झालाय. प्रशासनाकडून रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सगळ्यांची टेस्ट घेतली जात आहे.

बिहारच्या गया जिल्ह्यात दोन दिवसांचा बौद्ध सेमिनार होणार आहे. या सेमिनारच्या कार्यक्रमात दलाई लामा हे देखील सहभागी होणार आहेत. या सेमिनारला जगाच्या वेगवेगळ्या भागातून अनेक बौद्ध भिक्षु येणार आहेत. दरम्यान, आरोग्य विभागाकडून विमानतळावर विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड टेस्ट केली जातेय.