22 नोव्हेंबरला संपूर्ण राज्य अंधारात बुडणार, सायरन वाजताच 75 जिल्ह्यांचा विद्युत पुरवठा खंडित, नेमकं काय घडणार?

22 नोव्हेंबर रोजी 75 जिल्ह्यांमधील विद्युत पुरवठा पूर्णपणे खंडित केला जाणार आहे. सायरन वाजताच संपूर्ण राज्य अंधारात बुडून जाणार आहे. या पार्श्वभूमीवर आधीच सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.

22 नोव्हेंबरला संपूर्ण राज्य अंधारात बुडणार, सायरन वाजताच 75 जिल्ह्यांचा विद्युत पुरवठा खंडित, नेमकं काय घडणार?
Mock drill
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 21, 2026 | 6:51 PM

22 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता एक सायरनचा आवाज ऐकून येणार आहे. त्यानंतर संपूर्ण राज्य अंधारात बुडून जाणार आहे. तब्बल 75 जिल्ह्यांमध्ये बत्ती गुल होणार आहे. सायंकाळी लाईट गेल्यानंतर लोकांना सुरक्षित जागी जाण्याच्या सूचना करण्यात येतील आणि त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकं पुढचे सर्व सूत्रं आपल्या हाती घेणार आहेत. तब्बल 75 जिल्ह्यांमध्ये अंधार होणार आहे. या काळात जिल्हा प्रशासनाने अलर्ट मोडवर राहावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत. उत्तर प्रदेशमध्ये येत्या 22 नोव्हेंबर रोजी हे सर्व घडणार आहे, या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने आधीच अलर्ट जारी करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 22 नोव्हेंबर रोजी नेमकं असं काय घडणार आहे की, राज्यातील तब्बल 75 जिल्ह्यांची बत्ती गुल होणार आहे सायरन देखील वाजवला जाणार आहे? असा प्रश्न आता तुमच्या मनात निर्माण झालाच असेल. उत्तर प्रदेशमध्ये 22 नोव्हेंबरला सायंकाळी सहा वाजता मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं आहे. ज्यामध्ये युद्धासारखी आणीबाणीची स्थिती निर्माण झाली तर त्यामधून बचाव कसा करायचा, युद्धासारख्या परिस्थितीला तोंड कसं द्यायचं? याचा अभ्यास केला जाणार आहे.

Loading...

या काळात 75 जिल्ह्यांमधला विद्युतपुरवठा खंडीत केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण राज्यच अंधारात बुडून जाणार आहे. विद्युतपुरवठा खंडित झाल्यानंतर सायरन वाजणार आहे. सायरन वाजल्यानंतर नागरिकांना सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकं पुढचे सर्व सूत्रं आपल्या हाती घेणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाला अलर्ट मोडवर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हवाई हल्ल्याच्या सूचना देणारा हा सायरन तब्बल दोन मिनिटं वाजवला जाणार आहे, त्यानंतर धोका टाळल्यानंतर पुन्हा एकदा परिस्थिती पूर्वपदावर आल्याचा आणि धोका टळल्याचा सायरन वाजणार आहे, त्यानंतर खंडित झालेला विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात येणार आहे.

मॉक ड्रिल कशासाठी ?

समजा राज्यात जर युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली तर त्यापासून बचाव कसा करायचा? हे नागरिकांना दाखवून देण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us