AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीने अटक केलेल्या एका मुख्यमंत्र्यांना जामीन, मात्र दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना कोर्टाचा झटका

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने दिलासा दिला आहे. त्याने कोर्टाने १ जून पर्यंत अंतरिम जामीन दिला आहे. त्यामुळे २ जूनला त्यांना पुन्हा हजर व्हावे लागणार आहे. ईडीने अटक केल्यानंतर त्यांना आज जामीन मिळाला असला तरी झारखंडचे माजी मुख्यमंत्री यांना कोर्टाने झटका दिला आहे.

ईडीने अटक केलेल्या एका मुख्यमंत्र्यांना जामीन, मात्र दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना कोर्टाचा झटका
| Updated on: May 10, 2024 | 4:41 PM
Share

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अखेर दिलासा मिळाला आहे. त्यांना जामीन मंजूर झाला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलाय. 1 जून पर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. 1 जून पर्यंत हा अंतरिम जामीन असणार आहे. दिल्लीत लोकसभेसाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर 2 जून रोजी त्यांना पुन्हा पोलिसांकडे आत्मसमर्पण करावं लागणार आहे. दारु घोटाळ्यात ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती.

हेमंत सोरेने यांना झटका

दुसरीकडे झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीये. त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. हेमंत सोरेन यांनी देखील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. हेमंत सोरेन यांनी निवडणूक प्रचारासाठी जामीन मंजूर करावा अशी विनंती यात करण्यात आली होती. पण सुप्रीम कोर्टाने म्हटले की, तुमच्या याचिकेवर आता हायकोर्टाने निर्णय दिला आहे, त्यामुळे ही याचिका निष्प्रभ ठरली आहे.

हेमंत सोरेन यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने आदेश राखून ठेवला होता, मात्र अद्याप निकाल दिलेला नाही. अटक बेकायदेशीर ठरवणाऱ्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. याआधीही झारखंड हायकोर्टाने माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

का मागितला होता जामीन

हेमंत सोरेन यांनी याआधी आपल्या काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्यासाठी जामीन मागितला होता. मात्र, पोलीस कोठडीत असताना न्यायालयाने त्यांना काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहण्याची परवानगी दिली होती. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन त्यांच्या काकांच्या श्राद्धाला उपस्थित राहणार आहेत.

झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी त्यांचे मोठे काका राजाराम सोरेन यांच्या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी देखील न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र त्यावेळी त्यांची याचिका कोर्टाने फेटाळून लावली होती. पीएमएलए कोर्टाने त्यांचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला होता.

हेमंत सोरेन यांनी यांचे काका राजाराम सोरेन यांचे २७ एप्रिल रोजी निधन झाले होते. सोरेन यांना त्यांच्या अंतिम संस्कारात आणि श्राद्धात सहभागी होण्याची परवानगी मागितली होती. त्यासाठी त्यांनी १३ दिवसांच्या अंतरिम जामीनासाठी विनंती केली होती.

महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?
महाराष्ट्रातील खासदारांकडून दिल्लीत जरांगेंची भेट, कारण नेमकं काय?.
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात..
ठाकरे बंधूंच्या युतीवर संजय राऊत यांचं मोठं वक्तव्य, येत्या आठवड्यात...
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा
जे हिंदुत्वाचे नाही झाले ते... ठाकरेंवर निशाणा साधणाऱ्या बॅनरची चर्चा.
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री
टन टन टोल टोल... गुणरत्न सदावर्तेंकडून राज ठाकरेंच्या भाषणाची मिमिक्री.
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का
खूप गोष्टी बोलू शकत नाही... घोसाळकर भाजपात अन् ठाकरे गटाला मोठा धक्का.
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?
तपोवनवर डॅमेज कंट्रोल? वृक्षबचाव आंदोलनानं नाशिकची बदनामी कशी?.
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?
मुंबईसह 29 शहरांमध्ये पालिकेच्या निवडणुका, कुठं मैत्री अन कुठं कुस्ती?.
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक
मोदी तेरी कब्र खुदेगी घोषणांमुळे संसदेत हंगामा अन् भाजप आक्रमक.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.