Onion Price Hike : मोठी बातमी, कांदा झाला स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; किती किलोने मिळणार कांदा?

कांद्याच्या वाढत्या दरांमुळे सर्वसामान्य ग्राहक त्रस्त झाले होते. यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत, आता कांदा 35 रुपये किलो दराने विकण्याची घोषणा केली आहे. 'कांदा एक्सप्रेस' आणि सरकारी एजन्सींच्या (NAFED, NCCF, केंद्रीय भंडार) माध्यमातून हा सवलतीचा कांदा देशभरात पोहोचवला जाईल. यामुळे महागाईतून ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Onion Price Hike : मोठी बातमी, कांदा झाला स्वस्त, केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; किती किलोने मिळणार कांदा?
Onion price
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 25, 2026 | 4:37 PM

महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांच्या किचनचं बजेट कोलमडलं आहे. कांदा दरवाढीचा फटका केवळ ग्राहकांनाच नव्हे तर व्यापाऱ्यांनाही बसला आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नागरिकांकडून संताप व्यक्त होत असतानाच केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सर्व सामान्यांना दिलासा मिळावा म्हणून केंद्र सरकारने कांदा 35 रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सामान्य ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अचानकपणे कांद्याच्या किमती वाढल्याने देशातीलकाही भागात कांदा 60 ते 70 रुपये किलोने विकला जात होता. त्यामुळे सरकारने स्वत:हून पुढाकार घेत कांद्याची किंमत अर्ध्यावर आणली आहे. केंद्राने 35 रुपये किलोने कांदा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

कांदा एक्सप्रेस सुटली…

देशातील ज्या भागात कांद्याचे भाव वेगाने वाढले आहेत, त्या भागात स्वस्त कांदा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारने रेल्वेचा सहारा घेतला आहे. नाशिकमधून सरकारी बफर स्टॉकमधील कांदा स्पेशल मालगाडीतून म्हणजे कांदा एक्सप्रेसमधून देशातील वेगवेगळ्या राज्यात पाठवला जात आहे.

कांद्याच्या दराला लगाम घालण्यासाठी कांदा एक्सप्रेसची पहिली खेप देशातील प्रमुख भागात पाठवली जात आहे. चेन्नई, मदुराई, कोच्चि आणि गुवाहाटी येथे कांदा एक्सप्रेसने कांदा पाठवला जात आहे. तसेच 800 टनाहून अधिक कांद्याची दुसरी खेप दिल्लीसह उत्तर भारतातील इतर प्रमुख शहरांमध्ये पाठवण्यात येणार आहे.

कुठे मिळेल 35 रुपये किलो कांदा

ग्राहकांपर्यंत स्वस्त दरात कांदा पोहोचवण्याची जबाबदारी प्रमुख सरकारी आणि सहकारी एजन्सींकडे देण्यात आली आहे. सामान्य ग्राहक या सरकारी आऊटलेट्स आणि व्हॅनमधून 35 रुपये किलोने कांदा खरेदी करू शकतील.

सामान्य लोक आपल्या आजूबाजूच्या नॅशनल अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (NAFED), नॅशनल कोऑपरेटिव्ह कंज्यूमर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि केंद्रीय भंडारमधून कांदा खरेदी करू शकतील. NCCF आणि NAFED द्वारा संचालित मोबाइल व्हॅन आणि ‘भारत ब्रँड’च्या आउटलेट्सवर स्वस्त दरात कांद्याची विक्री करण्यात येणार आहे.

सरकारचा उद्देश काय?

पावसामुळे झालेलं नुकसान आणि सणासुदीमुळे देशात कांद्याच्या किंमती 60 ते 70 रुपये किलोपर्यंत गेल्या आहेत. केंद्र सरकारच्या माहितीनुसार, सरकारकडे पर्याप्त बफर स्टॉक आहे. थोक मंडयांमंद्ये आणि किरकोळ बाजारात स्वस्त दरात कांदा पुरवला जाणार आहे. त्यामुळे कांद्याच्या साठेबाजीला आळा बसणार आहे. त्यामुळे सामान्य लोकांच्या घराचं बजेट कोलमडणार नाही.

Follow Us