ओपनियन पोल : हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पाहा कंगना रनौतचं काय होणार?

| Updated on: Apr 16, 2024 | 7:21 PM

देशातील लोकसभा निवडणुकीच्या आधी ओपनियन पोल समोर आला आहे. यामध्ये भाजपला मोठा फायदा होताना दिसत आहे तर काँग्रेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे. लोकसभा निवडणुकीत नशीब आजमवत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतला विजय मिळणार का? पाहा ओपनियन पोल काय सांगतोय.

ओपनियन पोल : हिमाचलमध्ये काँग्रेसला मोठा धक्का, पाहा कंगना रनौतचं काय होणार?
opinion poll
Follow us on

himachal loksabha opinion poll : हिमाचल प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार विक्रमादित्य सिंह यांच्या विरुद्ध अभिनेत्री कंगना रनौत उभी आहे. काँग्रेसने विक्रमादित्य यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी मंडी लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला सुरुवात केवी आहे.  भाजपने कंगनाला तिकीट दिल्यापासून, यावेळी काँग्रेसने विद्यमान खासदार प्रतिभा सिंह यांच्याऐवजी विक्रमादित्य सिंह यांना उमेदवारी दिली आहे. पण आता टीव्ही ९चा ओपिनियम पोल समोर आला आहे. पाहा या सर्व्हेनुसार कंगना विजयी होतेय की पराभवाचा धक्का लागतोय.

कंगना विजयी होणार का?

टीव्ही ९ केलेल्या सर्व्हेनुसार हिमाचलमधील लोकसभेच्या 4 जागांमध्ये सर्व जागा भाजपच्या खात्यात जात आहेत, राज्यात काँग्रेसची सत्ता असूनही एकही जागा काँग्रेसला मिळताा दिसत नाहीये. मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाले तर एनडीएला येथे 55.73 टक्के मते मिळू शकतात. याचा अर्थ कंगनाला मंडी लोकसभा मतदारसंघातून विजय मिळताना दिसत आहे.

त्याला लागूनच असलेल्या उत्तराखंडबद्दल बोलायचे झाले तर येथे देखील सर्व 5 जागा भाजपच्या खात्यात जातांना दिसत आहेत, या सर्व जागांवर भाजपला विजय मिळताना दिसत असल्याने काँग्रेसला मोठा झटका  लागू शकतो. सर्वेक्षणानुसार, जर आपण मतांचा हिस्सा बघितला तर एनडीएला 56.77 टक्के मते मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 26.24 टक्के मते मिळू शकतात.

हे पण वाचा: बारामतीत कुणाला लागणार झटका, पाहा ओपिनियन पोलनुसार कोण होणार खासदार?

सातव्या टप्प्यात मतदान

हिमाचल प्रदेशातील चारही जागांसाठी एकाच दिवशी मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानुसार 1 जून येथे मतदान होणार आहे. देशभरात सात टप्प्यात मतदान होणार आहे, त्यापैकी सातव्या टप्प्यात हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुका होणार आहेत. देशभरात मतदान झाल्यानंतर ४ जून रोजी निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. राज्यात प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेसमध्येच स्पर्धा आहे.

हिमाचलमधील कांगडा, मंडी आणि हमीरपूर या जागा सामान्य श्रेणीतील आहेत. तर, शिमला जागा अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी राखीव आहे.