
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या ९ तळांवर एअर स्ट्राईक करून ते उद्ध्वस्त केले. या कारवाईत १०० हून अधिक दहशतवादी मारले गेले. यानंतर पाकिस्तानने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हवाई हल्ल्याचा प्रयत्न केला, मात्र याला भारतीय हवाई दलाने चोख प्रत्युत्तर देत हवेतच उद्ध्वस्त केले. यानंतर भारताने आक्रमक पवित्रा घेत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम आणि रडार सिस्टीम ड्रोन हल्ल्यांच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली.
भारताने केलेल्या या कारवाईनंतर आता पाकिस्तान हादरला आहे. भारताने पाकिस्तानमधील १२ शहरांवर ड्रोन हल्ले केल्याने हवाई संरक्षण यंत्रणेला मोठा फटका बसला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर आता दोन्ही देशांमधील तणाव अधिक वाढला आहे. या ऑपरेशनची आंतरराष्ट्रीय स्तरावरही दखल घेतली गेली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरतंर्गत दोनदा पाकिस्तानात हल्ले केले. यानतंर ऑपरेशन सिंदूरचे आणखी पार्ट असणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. आता यावर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी उत्तर दिले आहे.
पाक पुरस्कृत दहशतवादी जिथे जिथे असतील त्यांना आम्ही शोधून काढू. आम्ही त्यांना आयडेंटिफाय करून ट्रॅक करू आणि जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतील तर त्यांना आम्ही संपवू अशा प्रकारची घोषणा करण्यात आली. फेज वन ऑपरेशन सिंदूर याच्या माध्यमातून फक्त नऊ जे वेगवेगळ्या प्रकारचे पाकिस्तान व्याप्त कश्मीर त्याचबरोबर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये असणारे दहशतवादी आहेत, त्याला आपण उद्ध्वस्त केलं. पण इंटेलिजन्स इनपुटच्या अनुसार एकूण 21 ठिकाणी अशा प्रकारचे जे आहेत दहशतवाद्यांचे तळ आहेत याचा अर्थ नऊपेक्षा सुद्धा जास्त दहशतवादी तळ असल्यानंतर भविष्यामध्ये त्याचाही त्या ठिकाणी एक प्रकारे आपण नेम घेऊ शकतो. या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानमध्ये लपून बसलेले आहेत. त्यांना सपोर्ट आयएसआयचा पाकिस्तानच्या लष्कराचा आहे त्याचाही आपल्याला बंदोबस्त या ठिकाणी करावा लागणार आहे, असे सतीश ढगे म्हणाले.
या अनुषंगानं येणाऱ्या काळामध्ये या प्रोजेक्ट सिंधूचा ऑपरेशन सिंदूरचा फेज वन फेस टू फेस थ्री या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी असणार आहेत आणि याच्या सोबतीलाच ज्या प्रकारे पाकिस्तान या सगळ्या सिच्युएशनमध्ये रिटायलेट करेल. त्याला सुद्धा जशास तसे उत्तर देण्यासाठी भारत तयार राहणार आहे. म्हणूनच फक्त फेज वनच्या माध्यमातून आपण पाकिस्तान मध्ये असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे दहशतवादी तळ आहेत, त्याला उद्ध्वस्त केलेल आहे. पण मुळातच पाक पुरस्कृत दहशतवाद जर संपवायचा असेल तर त्याला सपोर्ट करणारे आका त्याला सपोर्ट करणार पाकिस्तानचं लष्कर आयएसआय आणि त्यांचे फायनान्सर यांचा सुद्धा बंदोबस्त करावा लागणार आहे. त्याच अनुषंगानं या ऑपरेशन सिंदूरचा पार्ट टू, पार्ट थ्री, पार्ट फोर बाकी असणार आहे. म्हणूनच पहिल्या या फेज वन नंतर येतो झाकी हे पिक्चर आणखीन बरंच काही पाहणं बाकी आहे असं जर आपण म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही, असेही सतीश ढगे यांनी सांगितले.