आमदार अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात 150 हून अधिक लज्जतदार डीशेस, 4 लाख वऱ्हाडींसाठी 30 लाख रसगुल्ले
बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांच्या कन्येच्या विवाहाच्या मेजवाणीत पारंपरिक बिहारी खाद्यपदार्थांसह देश-विदेशातील खास डिशेसचा समावेश आहे. लग्नात १००० हून जास्त हलवाई आणि शेफना मुदपाकखान्यात कामाला लावण्यात आले आहेत.

बिहारच्या मोकामाचे आमदार अनंत सिंह यांची कन्या शिवांगी सिंह हीच्या विवाहाची तयारी आणि भव्य मेजवाणीची चर्चा सर्वत्र सुरु आहे. या विवाह समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांसाठी ३० लाख रसगुल्ले तयार केले गेले आहेत. बिहारच्या पारंपारिक लिट्टी-चोखासह अनेक खाद्यपदार्थांचा मेन्यूत समावेश केला आहे. या शाही मेजवाणीचे आयोजना संदर्भात या भागात लोकांमध्ये मोठा उत्साह पसरला आहे. या विवाह सोहळ्यासाठी लाखो लोकांच्या पंगती बसल्या आहेत असे म्हटले जात आहे.
शाही मिठाई आणि बरेच काही…
अनंत सिंह यांची कन्येच्या शाही विवाहासाठी १५० हून लज्जतदार पक्वान तयार केले गेले आहेत. या मिठाईंवर खास फोकस ठेवला आहेत. या मिठाईत रसगुल्ला, गुलाब जामुन, राजभोग, काला जामुन, मालपोहे, जिलेबी, गाजराचा हलवा, मखान्याची खिर आदी पदार्थांची रेलचेल आहे.
मेन्यूत काय-काय आहे
या शाही विवाहात बिहारची प्रसिद्ध डीश लिट्टी चोखाचा समावेश केला जात आहे. स्टार्टरमध्ये चाट, गोलगप्पे, आलू टिक्की, डोसा, चिल्ला, चाऊमिनचा समावेश आहे. शाही विवाह समारंभात शुद्ध शाकाहारी मेन्यूत अनेक भाज्यांचा समावेश केला आहे. यात पनीर, बटाटा-फ्लॉवर आणि काश्मीरी पुलाव या मेन्यूचा देखील समावेश आहे. दोन प्रकारच्या पूऱ्या आणि कचोरी, नान पासून ते लच्छा पराठा आणि रुमाली रोटी देखील वाढली जात आहे.
पारंपरिक बिहारी खाद्यपदार्थांसह देश-विदेशातील खास डिशेसपर्यंत या मेन्यूत समावेश आहे. लग्नात १००० हून जास्त हलवाई आणि शेफ मुदपाकखान्यात कामाला लावण्यात आले आहेत.
लग्नात 150 जास्त डीशेस
अनंत सिंह यांच्या मुलीच्या लग्नात जवळपास ४ चार लाख देशी आणि विदेशी पाहूण्यांसाठी १५० हून अधिक डीशेस वाढण्यात येत आहेत. यात स्टार्टर्स, मेन कोर्स आणि रॉयल डेझर्ट्सचा समावेश आहे. या विवाहात बिहारच्या देशी पक्वानांसह विदेशी डीशेसचा देखील समावेश करण्यात आला आहे.
लग्नसमारंभात भारतीय आणि विदेशी खाद्यपदार्थांचा संगम
या विवाह समारंभात पारंपरिक भारतीय पदार्थांसोबतच, सर्व प्रकारच्या आवडीनिवडीच्या पाहुण्यांसाठी काहीतरी खास उपलब्ध असावे, यासाठी कॉन्टिनेन्टल, चायनीज आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. विविध प्रकार आणि स्वादांची कुल्फी आणि आईस्क्रीमदेखील देण्यात आली.