
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेनंतर पाकिस्तानच्या मनात चांगलीच भीती निर्माण झाली आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानकडून ‘कॉपी पेस्ट’ कारवाई करण्यात आली. भारताने सिंधु नदी पाणी वाटप करार रद्द केला तर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. दोन्ही देशांचा व्यापारही ठप्प होणार आहे. या हल्ल्याचे परिणाम पाकिस्तानसाठी किती महाग ठरतील, त्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारीच स्पष्ट शब्दांमध्ये संकेत दिले. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असीम मुनीर यांच्यापर्यंत पहलगाम हल्ल्याची संशयाची सूई जात आहे. काही दिवसांपूर्वी असीम मुनीर यांनी केलेले वक्तव्य पहलगाम हल्ल्याची तयारीच असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. पाकिस्तानला या हल्ल्याची किती मोठी किंमत चुकवावी लागेल, पाहू या एक्सप्लेनरमधून… भारतामधीलच नाही तर पाकिस्तानमधील पत्रकार, निवृत्त लष्करी अधिकारी पहलगाम हल्ल्यात लष्कर प्रमुख असीम मुनीर यांची भूमिका असल्याचे वक्तव्य करत आहेत....