
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानविरोधात धाडधाड मोठे निर्णय घेत आहे. भारताने अनेक निर्णय घेऊन पाकिस्तानला आतापर्यंत अनेक धक्के दिले आहेत. आम्ही पहलगाम हल्ल्याचा बदला घेऊ, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्यानंतर भविष्यात कोणत्याही क्षणी भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. असे असतानाच आता एलओसीजवळ मोठ्या घडामोडी घडत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार सध्या एलओसीजवळील नीलम खोऱ्यातील सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आले आहेत.
ळालेल्या माहितीनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने एलओसीजवळील नीलम खोऱ्यातील सर्व हॉटेल्स रिकामे करण्याच आदेश देण्यात आला होता. या आदेशानंतर सर्व हॉटेल्स रिकामे करण्यात आले आहेत. भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. एलओसीच्या नीलम खोऱ्यातील हॉटेल्ससोबत विविध आस्थापनाही रिकामा करण्यात आल्या आहेत. खबरदाही म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
भारत पाकिस्तानची वेगवेगळ्या मार्गातून कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. याच प्रयत्नांचा भाग म्हणून भारताने अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. भारतात पाकिस्तानी पंतप्रधानांचे यूट्यूब चॅनेल बंद करण्यात आले आहे. सोबतच पाकिस्तानी माजी क्रिकेटर शोएब अख्तर याचेही यूट्यूब चॅनेल बंद करण्याचा भारताने निर्णय घेतला आहे. यासह पाकिस्तानच्या मनोरंजन क्षेत्रात प्रसिद्ध असलेल्या काही अभिनेते, अभिनेत्रींची इन्स्टाग्राम खातीही भारतात बंद करण्यात आली आहेत. यात अभिनेत्री हानिया आमीर, अभिनेत्री माहिरा खान यासारख्या दिग्गज चेहऱ्यांचा समावेश आहे.
दुसरीकडे पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिलेला आहे. त्यामुळे अटारी सीमेवर पाकिस्तानी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाकिस्तानने अटारी सीमा बंद केली होती. मात्र आता ही सीमा चालू करण्यात आली आहे. पाकिस्तान स्वत:च्याच नागरिकांना गेड उघडत नसल्याची परिस्थिती तेथे पाहायला मिळत आहे. ज्या पाकिस्तानी नागरिकांकडे भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाकित्तान त्यांच्या देशात प्रवेश देत नाहीये. काही नागरिक हे दोन दिवसांपासून अटारी सीमेवर अडकेलेले आहेत. मात्र सध्या फक्त पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या नागरिकांनाच पाकिस्तानात प्रवेश दिला जात आहे.