LIVE : भारताच्या हद्दीत पाकिस्तानी विमानं घुसली, वायूसेनेने पळवून लावलं

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय. पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर …

LIVE : भारताच्या हद्दीत पाकिस्तानी विमानं घुसली, वायूसेनेने पळवून लावलं

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये युद्धाची स्थिती आहे. भारताने एअर स्ट्राईकनंतर केल्यानंतर पाकिस्तानने मूर्खपणा करत भरदिवसा त्यांची विमानं भारताच्या हवाई हद्दीत घुसवली. पाकिस्तान वायूसेनेच्या विमानांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करत बॉम्ब फेकण्याचा प्रयत्न केला. पण सतर्क असलेल्या वायूसेनेने ही विमानं पळवून लावली. भारतीय हद्दीत पाकिस्तानची तीन विमाने घुसल्याचं बोललं जातंय. पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय.

या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर प्रवासी विमानांची वाहतूकही बंद करण्यात आली आहे. श्रीनगर विमानतळाचा रन वे रिकामा करण्यात आलाय. लेह, जम्मू, श्रीनगर आणि पठाणकोट एअरस्पेसला हायअलर्टवर ठेवण्यात आलंय. खबरदारीचा उपाय म्हणून प्रवासी वाहतूक थांबवण्यात आली आहे. कारण, सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब मानली जाते.

लाईव्ह अपडेट्स : 

  • पाकिस्तान सीमेजवळील सर्व विमानतळं बंद करण्याचे आदेश, भारतीय हवाई दलाला युद्ध सज्जतेचे आदेश
  • आंतरराष्ट्रीय नियमानुसार एकदा हद्दीत दोन किमीपर्यंत घुसण्याचा अधिकार, पण दुसऱ्यांदा घुसखोरी झाल्यास ते विमान पाडण्याचा पूर्ण अधिकार – निवृत्त कर्णल
  • अमृतसर विमानतळावर येणारी सर्व विमाने वळवली, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा सीमावर्ती भागातील दौरा रद्द
  • होय आम्हीच भारतीय विमान पाडलं, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांकडून दावा
  • अजित डोभाल यांच्याशी चर्चेनंतर गृहमंत्रालयाने बैठक बोलावली, दिल्लीत हालचाली वाढल्या, डीजी सीआरपीएफ, डीजी बीएसएफ आणि डीजी सीआयएसएफ बैठकीला उपस्थित राहणार
  • पाकिस्तानच्या घुसखोरी केलेल्या विमानांनी रिकाम्या जागेत बॉम्ब टाकून पळ काढला, भारतीय वायूसेनेकडून चोख प्रत्युत्तर
  • राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार केंद्रीय गृहमंत्रालयात दाखल
  • श्रीनगर, लेह, जम्मू विमानतळ बंद
  • जैसलमेरमधील गावं खाली करण्याचे आदेश

भारतीय वायूसेना एअर स्ट्राईकनंतर हायअलर्टवर आहे. पाकिस्तानी मीडियाने स्वतःची पाट थोपटून घेणं सुरु केलंय. पाकिस्तानी जनतेला काही तरी दाखवण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. विमानं पळवून लावली तरीही पाकिस्तानकडून स्वतःची पाठ थोपटवून घेतली जात आहे. आम्ही बदला घेऊ असं पाकिस्तानकडून सातत्याने सांगितलं जात आहे.

दरम्यान, काही तांत्रिक कारणामुळे भारतीय विमान कोसळलंय. हे विमान आपणच पाडलं असल्याचा दावा पाकिस्तानकडून केला जातोय. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय वायूसेनेचं मिग हे विमान कोसळल्याची घटना घडली आहे. तांत्रिक कारणांमुळे हे विमान बडगाम या जिल्ह्यात कोसळल्याचं बोललं जातंय. या दुर्घटनेत वायूसेनेचे दोन पायलट शहीद झाले आहेत. या विमानांमध्ये एक ते दोनच पायलट असतात. यामध्ये जास्त जवान नसतात, अशी माहिती आहे. सीमेवर सध्या असलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ही घटना मोठी मानली जात आहे.

पाहा लाईव्ह

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *