
सीमेवर पाकिस्तानने पुन्हा एकदा कुरापती करण्यास सुरूवात केली. पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव प्रचंड वाढला होता. हेच नाही तर दोन्ही बाजूंनी सातत्याने गोळीबार सुरू होता. यादरम्यान पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकड्यांचे ड्रोन हवेतच फोडले. आता पुन्हा एकदा पाकिस्तानने काड्या करण्यास सुरूवात केली. जम्मू आणि काश्मीरच्या सांबा, पूंछ आणि राजौरी या जिल्ह्यांमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेजवळील भागात संशयास्पद ड्रोन हालचाल दिसून आल्या. हे ड्रोन पाकिस्तानमधून भारतात पाठवण्यात आली. भारतीय हद्दीत घुसलेल्या ड्रोननंतर भारताच्या बाजूने गोळीबार करण्यात आला. ड्रोन दिसल्यानंतर भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून लगेचच तपास अभियान राबवण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या बाजूंनी घुसखोरी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे.
भारताच्या हद्दीत एकाचवेळी अनेक भागात ड्रोन दिसल्याचे खळबळ उडाली. राजाैरी जिल्ह्यातील तेरयाथ गावात ड्रोन पोहोचले. पुढे कालाकोट आणि धरमसाल गावाच्या दिशेने ड्रोन गेले. ड्रोनमध्ये स्पष्टपणे ब्लिकिंग लाईट दिसत होती. रामगढ सेक्टरच्या बबराल गावमध्ये 7.15 च्या आसपास दुसरे ड्रोन दिसले. काही सेकंद हे ड्रोन गावावरती फिरताना दिसले. त्यानंतर ते ड्रोन थेट पाकिस्तानच्या दिशेने वेगाने निघून गेले.
पुंछ जिल्ह्यातील मनकोट सेक्टर LOC च्या सायंकाळी जवळ 6.25 ड्रोन दिसले. येथेही ड्रोनची ब्लिंकिंग लाईट स्पष्टपणे दिसत होती. सतत ड्रोन दिसत असल्याने सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. सांबा जिल्ह्यातील घगवालच्या पलाैरा गावजवळ ड्रोनच्या माध्यमातून काही हत्यार पाकिस्तानातून भारतात पाठवण्यात आल्याचीही माहिती मिळत आहे.
#BREAKING: Indian Army has fired in the air after observing drone movement from Pakistan towards India’s Village Gania, Kaldian of Nowshera of Jammu & Kashmir. MMG and LMG fired at the drones. Yesterday a Pakistani drone had also dropped a consignment in Samba of J&K. pic.twitter.com/vKFRl2TCMf
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) January 11, 2026
राजाैरी जिल्ह्यातील नाैशेरा सेक्टर LOC जवळील गनिया आणि कलसिया या गावात सायंकाळी 6.35 च्या अंदाजात ड्रोन दिसले. ड्रोन दिसताच भारतीय सैन्याने हे ड्रोन पाडण्यासाठी जोरदार फायरिंग केली. पाकिस्तानातून ड्रोनच्या माध्यमातून भारतात हत्यार पाठवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सुरक्षा यंत्रणांचे पाकिस्तानच्या ड्रोनवर बारीक लक्ष असून भारत अलर्ट मोडवर आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानकडून कायम दावा केला जातो की, आम्ही दहशतवादाविरोधात आहोत, मात्र, पाकिस्तान दहशतवादीच चालवतात हे यापूर्वीही अनेकदा स्पष्ट झाले.