आधी अँकर, आता खासदार…; भारताच्या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तान रडकुंडीला

भारताने पाकिस्तानधील 12 शहरांवर ड्रोनने हल्ला केला. भारताने या हल्ल्यात लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान अक्षरश: रडकुंडीला आला आहे.

आधी अँकर, आता खासदार...; भारताच्या ड्रोन हल्ल्यानंतर पाकिस्तान रडकुंडीला
Pakistan mp tahrir iqbal
| Updated on: May 08, 2025 | 5:55 PM

पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याला भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानातील दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. यावेळी भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशवाद्यांच्या 9 तळांवर एअर स्ट्राईक करत उद्धवस्त केले. यानंतर पाकिस्तानाने भारताच्या १५ शहरांमधील लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, पण भारताने तो हाणून पाडला. यानंतर भारताने जोरदार प्रत्युत्तर देत पाकिस्तानच्या लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टीम उडवून टाकली. भारताने पाकिस्तानधील 12 शहरांवर ड्रोनने हल्ला केला. भारताने या हल्ल्यात लाहोरमधील रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान अक्षरश: रडकुंडीला आला आहे.

पाकिस्तानचा खासदार ढसाढसा रडला

भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर आता पाकिस्तानातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारताच्या कारवाईनंतर आता पाकिस्तानी संसदेवर शोककळा पसरली आहे. भारताच्या जोरदार प्रत्युत्तरामुळे हादरलेल्या पाकिस्तानचा खासदार ताहिर इक्बाल संसदेत अक्षरशः ढसाढसा रडल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. “या खुदा आम्हाला वाचव…अल्लाह आमची हिफाजत कर,” असे म्हणत त्यांनी संसदेतच हंबरडा फोडला.

भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कारवाईमुळे पाकिस्तानी संसदही हादरली आहे. माजी लष्करी अधिकारी आणि खासदार ताहिर इक्बाल हे संसदेत बोलताना रडल्याचे समोर आले आहे. यावेळी संसदेत सुरक्षा व्यवस्थेवर चर्चा सुरु होती. या चर्चेदरम्यान इक्बाल यांनी देवाला प्रार्थना करत मी दुआ करत आहे की अल्लाह हमारी हिफाजत करे.” असे म्हटले. त्यांच्या या विधानामुळे संसदेत एक शांतता पसरली.

पाकिस्तानी व्यवस्थापनेला मोठा धक्का

ताहिर इक्बाल यांच्या या विधानामुळे पाकिस्तानातील असुरक्षितता आणि राजकीय अस्थिरता स्पष्टपणे पाहायला मिळाली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानी व्यवस्थापनेला मोठा धक्का बसला. ही कारवाई अत्यंत अचूक, मर्यादित पण निर्णायक होती. यामध्ये दहशतवाद्यांच्या ट्रेनिंग कॅम्पला लक्ष्य करण्यात आले. संसदेत यावर चर्चा सुरू असताना इक्बाल यांनी त्यांचे मत मांडण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांना रडू लागले. त्यांचा हा व्हिडीओ पाकिस्तान आणि भारतात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

ताहिर इक्बाल हे पाकिस्तानच्या सैन्यात मेजर पदावर कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांनी पर्यावरण मंत्री, कश्मीर विषयक मंत्री आणि नंतर पीएमएल-एन पक्षाचे खासदार म्हणून महत्त्वपूर्ण पदे भूषवली आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोसळली आहे.

भारत सरकारचे अधिकृत निवदेन काय?

भारताने पाकिस्तानवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर याबद्दलचे अधिकृत निवेदन जारी करण्यात आले आहे. पाकिस्तानने काल रात्री १५ हून अधिक लष्करी ठिकाणांवर हल्ले केले. यात अवंतीपोरा आणि श्रीनगरमध्ये हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. याशिवाय श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, लुधियाना, अमृतसर, कपूरथला, जालंधर, बठिंडा, फलौदी आणि भुज येथेही हल्ल्याचा प्रयत्न झाले. मात्र, भारतीय लष्कराने पाकिस्तानचे सर्व हल्ले यशस्वीरित्या हाणून पाडले. यानंतर भारताने एस-४०० ‘सुदर्शन चक्र’ वापरून जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताने पहिल्यांदाच या शक्तिशाली क्षेपणास्त्राचा वापर करत ड्रोन हल्ले केले.