AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही, 3 महिन्यात 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटीचा दंड; थेट फास्ट ट्रॅक… दुरुस्ती विधेयकात काय काय?

पेपरफुटी प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कठोर पाऊल उचलत आहे. नवीन दुरुस्ती विधेयकात पेपर लीक करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. जलदगती न्यायालये अशा प्रकरणांचा त्वरित निपटारा करतील. परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रतिबंध घालून पारदर्शकतेसाठी हे विधेयक आणले जात आहे, जे लवकरच संसदेत मांडले जाईल.

Paper Leak : पेपर फोडणाऱ्यांची खैर नाही, 3 महिन्यात 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटीचा दंड; थेट फास्ट ट्रॅक... दुरुस्ती विधेयकात काय काय?
पेपरफुटीवरून आंदोलन सुरू, सरकारने घेतली गंभीर दखल
| Updated on: Jul 24, 2026 | 2:02 PM
Share

पेपर लीक प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकार कायद्यात दुरुस्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी दुरुस्ती विधेयक आज कॅबिनेटमध्ये येणार आहे. या विधेयकात कठोर शिक्षेची तरतूद करण्यात येणार आहे. पेपर लीक करणाऱ्यांना  10 वर्षाची शिक्षा आणि एक कोटीचा आर्थिक दंड सुनावण्याची तरतूद करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे. आज कॅबिनेटमध्ये या बिलावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर ते संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडलं जाणार आहे. त्यामुळे या विधेयकातील तरतूदींकडे देशाचं लक्ष लागलं आहे.

सार्वजनिक परीक्षा (अनुचित मार्गांचा प्रतिबंध) अधिनियम, 2024 (The Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024) हा कायदा 21 जून 2024 पासून लागू आहे. या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज होणाऱ्या कॅबिनेटमध्ये हे दुरुस्ती विधेयक मांडलं जाणार आहे. नव्या कायद्यानुसार पेपर लीकमध्ये दोषी आढळणाऱ्यांना 10 वर्षाची शिक्षा आणि एक कोटीचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच हे विधेयक पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात संसदेत मांडलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

>> संसदेच्या दोन्ही सभागृहात दुरुस्ती विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न

>> परीक्षांमध्ये होणारे घोटाळे रोखणं आणि संबंधित कायदा अधिक कठोर करणं हा या विधेयकाचा हेतू आहे.

>> या प्रकरणाचे खटले वेगाने मार्गी लावण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टाला अधिक अधिकार दिले जाण्याची शक्यता आहे.

>> सध्याच्या कायद्यानुसार 3 ते 5 वर्षाच्या शिक्षेची तरतूद आहे. ती वाढवून 5 ते 10 वर्षाची केली जाणार आहे.

>> कमीत कमी दंड 10 लाख ते 1 कोटी करण्यात येणार आहे.

>> 2024 कायदा आधीच असताना नवीन दुरुस्ती कायदा का आणला जात आहे? असा सवाल विरोधक करत आहे. तसेच हा कायदा कसा लागू करणार? असा सवालही विरोधकांकडून केला जात आहे.

>> नीट लीक प्रकरणात 13 आरोपींवर 2024च्या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सरकारने दिली आहे

>> या प्रकरणाच्या सुनावणीसाठी आधीच फास्ट ट्रॅक कोर्टाची स्थापना करण्यात आल्याचंही सरकारने स्पष्ट केलंय.

>> नवं दुरुस्ती विधेयक अधिक कठोर असेल आणि परीक्षेत गडबड करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई होणार असल्याने त्यांच्या मनात भीती निर्माण होईल, असे संकेत मोदींनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Follow Us
राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी...
SMA | राज्यातील लहान मुलांमध्ये SMA या दुर्मिळ आजाराची लक्षणं! पालकांनी या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!
अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी!
BJP VS Shiv Sena | अंगावर आलात तर शिंगावर घेऊ; भंडाऱ्यात महायुतीत पुन्हा ठिणगी! शिवसेना-भाजप आमनेसामने
पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर..
MPSC Studant | पुण्यात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याचं अपहरण! अभ्यासिकेतून बाहेर पडताच गाडीत कोंबलं; नेमकं काय घडलं?
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये
MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या मान्य? फडणवीस ॲक्शन मोडमध्ये; पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर
जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल..
Vikhe Patil on Manoj Jarange | जरांगेंच्या आंदोलनावर विखे पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, अंतिम अहवाल आल्यानंतर...
मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा...
Mumbai | मीरा रोडच्या शाळेचा फतवा! पर्युषण काळात डब्यात कांदा-लसूण, बटाटा-बिटरूट आणण्यास मनाई; मनसेचं माळा घेऊन आंदोलन
लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
Babasaheb Patil | अश्लीलता नेमकी कशाला म्हणायचं? लावणीतील वाढत्या अश्लीलतेवर बाबासाहेब पाटील आक्रमक; थेट सरकारला...
मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
Jalna | जालन्यात मराठा-कुणबी आरक्षणाबाबत मोठी अपडेट! जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली माहिती, तब्बल एवढ्या प्रमाणपत्रांचं वाटप
राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर ठाकरे संतापले, म्हणाले..
Raj Thackeray | दादासाहेब फाळकेंच्या महाराष्ट्राला डावललं? राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार गुजरातला हलवल्यावर राज ठाकरे संतापले, म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...
शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! थेट शेतात जाऊन...